Pakistan : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पोलिसांवर हल्ला, ९ पोलीस ठार

झियारत : पाकिस्तानच्या (Pakistan) नैऋत्येकडील भागात बलुचिस्तान (Balochistan) प्रांताच्या झियारत जिल्ह्यात (Ziarat district) पोलिसांवर हल्ला झाला. या हल्ल्यात नऊ पोलिसांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी आठ पोलिसांचे अपहरण केले. काही काळानंतर हल्लेखोरांनी या पोलिसांना सोडून दिले.



हल्ल्यात ठार झालेल्या पोलिसांमध्ये दोन एसएचओ अर्थात Station House Officer (SHO) होते. काही पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांवर झालेला हल्ला हा अतिरेकी हल्ला असल्याचे सरकारी यंत्रणेने सांगितले. बलुचिस्तान प्रांतात बंडखोरांचे सुरक्षा यंत्रणेवरील हल्ले वाढले आहेत. यामुळे प्रांतात तणावाचे वातावरण आहे. सुरक्षा यंत्रणेला 'हाय अलर्ट' (High Alert) देण्यात आला आहे.



पोलिसांवरील हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने तातडीने मोठी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत १५ अतिरेकी ठार झाल्याचे सरकारी प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले. ठार झालेले सर्व अतिरेकी फितना अल खवारीज (Fitna al-Khawarij) अर्थात पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या मूळच्या तहरिक ए तालिबान पाकिस्तान (Tehreek-e-Taliban Pakistan / TTP) या संघटनेचे सदस्य होते, अशी माहिती शाहिद रिंद यांनी दिली. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे अतिरेक्यांच्या विरोधातील कारवाई सुरू राहील, असे सरकारी प्रवक्ते शाहिद रिंद म्हणाले.



झियारत जिल्ह्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे बलुच लिबरेशन आर्मी असल्याचा संशय आधी व्यक्त होत होता. बलुच लिबरेशन आर्मीनेच जिवानी या किनारपट्टीच्या शहरातील सुरक्षा चौकीवरील आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पण झियारत जिल्ह्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतलेली नाही.

Comments
Add Comment

Tibet dam failure alert : चिखलात बेपत्तांचा शोध अन् मदतकार्य सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा इशारा; तिबेटमध्ये पाण्याचा बांध फुटल्याची भीती

नेपाळ : नेपाळमध्ये तिबेटच्या हिमकडा कोसळण्याने आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडच्या विनाशातून सावरण्याचा प्रयत्न सुरू

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने

Nepal Flash Flood 2026 : नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! १६० जणांचा मृत्यू; ७५० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी नदीला

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'