Child Protection Act : इंस्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाच्या जाहिरातींप्रकरणी सरकारची मेटाला नोटीस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इंस्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींद्वारे प्रसारित होणाऱ्या बाल लैंगिक शोषण आणि गैरवापराशी (सीएसइएम) संबंधित मजकुरासंदर्भात मेटाला एक कठोर नोटीस बजावली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इंस्टाग्रामला सीएसइएमला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा अशा मजकुरापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने मेटाकडून सात दिवसांच्या आत सविस्तर प्रतिसाद मागितला असल्याची माहिती आहे.



मंत्रालय मेटाच्या मजकूर नियंत्रण प्रणाली (content moderation system), जाहिरात पुनरावलोकन प्रक्रिया (ad review process) आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील बेकायदेशीर व हानिकारक मजकुराविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी उचललेल्या पावलांविषयी सविस्तर माहिती देखील मागू शकते.



यापूर्वी, मंत्रालयाने मेटाला विचारले होते की, इंस्टाग्रामवर अशा जाहिराती कशा प्रसारित होतात आणि त्या थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मने कोणती पावले उचलली आहेत. तसेच, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकुराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी कंपनी कोणती पावले उचलत आहे, असेही विचारण्यात आले होते.दरम्यान, मेटा टीमने व्हॉट्सॲपच्या युझरनेम फीचरसंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सविस्तर प्रतिसाद देण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली. यानंतर, मंत्रालयाने मेटाला नोटीस बजावली.भारत सरकारने अलीकडेच व्हॉट्सॲपच्या युझरनेम फीचरच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना, व्हॉट्सॲपने स्पष्ट केले की त्यांचे नवीन युझरनेम फीचर पूर्णपणे ऐच्छिक असेल. कंपनीने सांगितले की, ओळख चोरी, ऑनलाइन फसवणूक आणि अवांछित संपर्क यांसारख्या समस्या टाळण्यासाठी हे फीचर लागू करण्यापूर्वी अनेक सुरक्षा उपाययोजना जोडण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून

Independence Day 2026 : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी फडकवणार तिरंगा; स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली हाय अलर्टवर, वाहतुकीपासून सुरक्षेपर्यंत कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी