Mumbai : केतन अग्रवाल प्रकरणात एक नवीन घडामोड समोर आली आहे. तपास करणाऱ्या पोलिसांनी एक धक्कादायक पुरावा उघडकीस आणला आहे. त्यांनी सिया गोयलच्या स्नॅपचॅट चॅट्सची कसून तपासणी केली असून, त्यावरून असे सूचित होते की हत्येचा संपूर्ण कट हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग होता.(Siya Goyal)
नवी दिल्ली : जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) नीती आणि शिस्तपालन आयोगाने (ईडीसी) माजी विश्वविजेता व्लादिमीर क्रॅम्निकवर (Vladimir Kramnik) दोन वर्षांची ...
मिळालेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये आरोपी सिया गोयल तिच्या एका मैत्रिणीशी २५ मे रोजी फ्लाईट तिकीट बुक करण्याबाबत बोलत होती. सिया फ्लाईट तिकीट बुक करण्याच्या बहाण्याने तिचे आधार कार्ड मागते. सियाने लिहिलं होतं की, "वेडिंग तिकिट्ससाठी आधार कार्डचे फ्रंट आणि बॅक पाठवून दे, जे होणार तर नाही पण तरीही पाठवून दे." तपास अधिकारी आता या गोष्टीचा सखोल तपास करत आहेत की हे संपूर्ण संभाषण आणि फ्लाईट तिकिटांचे बुकिंग केवळ एक दिखावा होता का?

लंडन: विम्बल्डनमध्ये सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि गतविजेता यानिक सिनर यांनी प्रभावी कामगिरी करत पुरुष एकेरीच्या १६ संघांच्या ...
सियाच्या चॅट्समुळे चर्चांना उधाण आले आहे. असा संशय व्यक्त केला जात आहे की, या चॅट्स आणि तिकीट बुक करून सिया हे दाखवण्याचा प्रयत्न करत होती की, केतन अग्रवालसोबत तिच्या लग्नाची तयारी एकदम चांगली सुरू आहे; जेणेकरून केतनच्या हत्येनंतर कोणालाही तिच्यावर संशय येणार नाही. हा संपूर्ण खटाटोप मर्डर प्लॅन लपवण्यासाठी आणि तिच्यावर कोणी संशय घेऊ नये यासाठी केला गेला होता.(Snapchat Viral)
डिजिटल तपास सुरू
पोलीस अधिकार्यांनी माहिती दिली आहे की, कोणत्याही डिजिटल चॅटची कायदेशीर फॉरेन्सिक तपासणी पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही चॅटला अंतिम पुरावा मानलं जाणार नाही.





