DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी, सातत्यपूर्ण दौरे आणि कामाचा अतिताण यामुळे त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.


शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच उपमुख्यमंत्री (DCM) शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यातच, धुळ्यातील उबाठा गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात नियोजित होता. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने उपमुख्यमंत्र्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आणि ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले.



गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेने 'ऑपरेशन टायगर'च्या (Operation Tiger) माध्यमातून उबाठा गटाच्या ६ खासदारांनंतर आमदार सचिन अहिर यांना पक्षात प्रवेश दिला. या पार्श्वभूमीवर व्यूहरचनेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना लागोपाठ दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. अधिवेशन आणि राजकीय गाठीभेटी अशा दुहेरी पातळीवरील प्रचंड दगदगीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे बोलले जाते.



मध्यरात्री २ वाजता पक्षप्रवेश


उपमुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाल्याने शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा लांबणीवर पडला होता. मात्र, राजकीय गणिते आणि मुहूर्त न दवडता, अखेर शुक्रवारी मध्यरात्री २ वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश पार पडला. नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत सुमारे ५० हजार मते घेणाऱ्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या