शेतीविषयक अभ्यास दौरे

आपल्या देशात शेतीविषयक अभ्यास दौरे परदेशात शेतकऱ्यांचे आयोजित केले जातात. आता शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे. तेव्हा शेती कशी केली जाते या विषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे माहिती मिळण्यासाठी शेतीविषयक अभ्यास दौरे आयोजित करण्यात यावेत. यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्षात शेतीविषयक अनुभव त्यांना मिळतो. याचा परिणाम ज्या विद्यार्थ्यांची शेती आहे ते विद्यार्थी अधिक जोमाने शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करू शकतात.


 

रवींद्र तांबे


भारत हा शेतीप्रधान देश असून शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे शाळेतील मुलांना शेती कशी केली जाते, याचा अभ्यास शालेय पुस्तकातून मिळत असला तरी प्रत्यक्षात अनुभवातून सुद्धा मिळायला हवा. तेव्हा शेतीची माहिती शेतीच्या बंधाऱ्यावर उभे राहून मिळणार नाही. तर प्रत्यक्षात शेतीच्या कोपऱ्यात वावरावे लागेल. म्हणजे कोपऱ्याची नांगरणी कशी केली जाते. मोठी डेफा कशी फोडली जातात. लावणीच्या वेळी तरवा कशा काढला जातो. त्याची पेंढी कशी बांधली जाते. त्याची लावणी करण्यापूर्वी चिखल कसा केला जातो. याची संपूर्ण माहिती त्यांना मिळते. तसेच प्रत्यक्षपणे शेतीत काम केल्याने अनुभव मिळतो. त्यामुळे त्याची किंमत विद्यार्थ्यांना समजते. तेव्हा कोणत्याही कामात अनुभव हा फार महत्त्वाचा असतो. अनुभवातूनच आपल्या चुका समजू शकतात. त्यानंतर चुका सुधारून शेतीचा विकास करू शकतो. त्यासाठी शेतीविषयक अचूक माहिती शेतकऱ्यांप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा समजणे गरजेचे आहे. कारण आजचे काही विद्यार्थी हे उद्याचे उत्कृष्ट शेतकरी आहेत आणि उत्कृष्ट शेतकरी बनण्यासाठी विद्यार्थ्यांना शेती हंगामात अभ्यास दौऱ्याची नितांत आवश्यकता आहे.


यावर्षी वरुणराजाचे उशिरा आगमन झालेले आहे. त्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी राजा शेतीच्या कामात गुंतलेला आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रातील आधुनिकीकरण समजून घेण्यासाठी आणि त्यांना शेती क्षेत्राची आवड निर्माण होण्यासाठी तसेच शेती क्षेत्राशी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो. त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते हे प्रत्यक्षात जवळून पाहाता येते. विशेष म्हणजे, सध्या बैल जोडीने नांगरणी केलेली फारशी दिसणार नाही, तर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरने नांगरणी करताना अधिक दिसेल. तेव्हा शेती हंगामात विद्यार्थ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यात यावेत इतके महत्त्व त्यांच्या दृष्टीने झाले आहे.


आज महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी महाविद्यालय व राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था पुणे, कृषी विज्ञान केंद्र व शारदानगर येथील प्रगत शेती प्रकल्प बारामती, हायड्रोनिक शेती, निर्यातक्षम द्राक्ष बागा व फुलशेती प्रकल्प नाशिक आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आहेत. येथे जाऊन विस्तुत माहिती विद्यार्थी घेऊ शकतात. तेव्हा ज्यांना शक्य असेल त्यांनी विद्यापीठात जायला काहीच हरकत नाही. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडणार आहे. विद्यापीठामध्ये अधिक माहिती मिळू शकते. त्या ठिकाणी तज्ज्ञ कृषी अधिकारी असतात त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपण करून घ्यायचा असतो. त्या आधी आपल्या गावच्या ग्रामविकास अधिकारी भाऊंचे मार्गदर्शन घ्यायला हवे.


शेतीविषयक पुस्तकातील माहिती आणि प्रत्यक्षात शेतात काम केल्याने मिळणारा अनुभव आनंद देणारा असतो. यामध्ये भाताची पेरणी कशी केली जाते. त्यानंतर लावणी कशी केली जाते. खताचा वापर कसा केला जातो. त्यांनतर त्याची कापणी कशी केली जाते. याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेव्हा त्या त्या शेती हंगामात विद्यार्थ्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले पाहिजेत. महत्त्वाची बाब म्हणजे अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते. यामध्ये सेंद्रिय शेती व ठिबक सिंचन या पद्धतीची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना मिळते. कारण आजही आपली शेती ही पावसावर अवलंबून असते हे विसरता कामा नये. तसेच शेतीविषयी अधिक माहिती हवी असल्यास कृषी विज्ञान केंद्रावर गेले पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या शंकांचे निरसन करता येते तसेच आपल्याला हवी असलेली माहिती मिळवू शकते.
अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना शेतातील मातीची माहिती मिळते. मातीची माहिती मिळाल्यामुळे त्यावर कोणत्या पिकांची लागवड करू शकतो ते आपण ठरवू शकतो. असे दौरे केल्याने शेतीला अनुसरून ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्याचा अभ्यास करता येतो. आजच्या काळाचा अभ्यास केल्यास अनेक ठिकाणी शेतकरी शेती सोडून शहरात जात असल्याचे दिसून येते. तेव्हा शेतीला पूरक जोडधंदे शेतकऱ्यांना करण्यास योग्य ती माहिती देणे. म्हणजे शेती सोडून शेतकरी शहरात जाणार नाहीत, यासाठी विविध प्रक्रिया उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग, विविध प्रकारच्या झाडांची लागवड करणे, कुकुटपालन, मेंढीपालन व डुक्कर पालन अशा प्रकारची माहिती त्यांना मिळते. यासाठी सामूहिक शेती करण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांची माहिती मिळते. तेव्हा विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन अधिक माहिती घेतल्यास किंवा स्थानिक कृषी विद्यापीठांना भेट दिल्यास शेतीच्या संदर्भात बिनचूक व अचूक माहिती मिळते. तसेच आपल्या भागात नावीन्यपूर्ण शेती शेतकऱ्यांनी केली असेल त्याच्या शेतात जाऊन पाहणी करून आपल्याला त्यांनी असे यश संपादन केले याची यशोगाथा समजू शकते. रोपवाटिकाची निर्मिती करू शकतो याला सुद्धा चागंले दिवस आलेले आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी शेतीविषयक माहिती घेण्यासाठी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या आसपास असणाऱ्या शेतीचे मालक, कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्रे यांच्याशी रीतसर पत्रव्यवहार करून त्यांची पूर्वपरवानगी घ्यावी. म्हणजे शेतीविषयक अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करणे सोपे जाते. यातूनच विद्यार्थ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान समजण्यास अधिक मदत होणार आहे.

Comments
Add Comment

जनसंवाद

सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा आरोग्यमंत्र्यांनी सोनोग्राफी केंद्रांमधील गैरप्रकार आणि गर्भलिंग

संकुचित राष्ट्रवाद

  अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जन्मजात नागरिकत्वाचा घटनात्मक अधिकार कायम ठेवत दिलेला निकाल हा केवळ एका

मराठवाड्याला केंद्रात मंत्रीपद?

मराठवाडा-डॉ. अभयकुमार दांडगे   ऑपरेशन टायगरनंतर मराठवाड्यातील राजकारणाने नवे वळण घेतले असून आता दिल्लीतील

स्मृती आणि संघटन

प्रदीप पाटील   कोणत्याही शहराचा इतिहास इमारती, रस्ते किंवा विकासकामांनी घडत नाही; तो घडतो नि:स्वार्थी

जनसंवाद

पावसाळ्यापूर्वी सतर्कता हवी चेंबूर येथे झाड पडून घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापूर्वीही अशा दुर्दैवी

परीक्षांची परीक्षा

नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचे वादळ अद्याप शांत झालेले नसतानाच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी