Nashik : लग्नाचं आमिष, अत्याचार अन् धर्म पाळण्याची सक्ती; नाशिकमध्ये पुन्हा खळबळ

Nashik : नाशिकमध्ये पुन्हा एकदा धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदरनिर्वाहासाठी परराज्यातून नाशिकमध्ये आलेल्या एका ४१ वर्षीय महिलेची असहाय्यता ओळखून तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर दुसऱ्या धर्माच्या परंपरा पाळण्याची सक्ती केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील संशयित रियाज बुराउद्दिन शेख (वय ४०, रा. संजीवनीनगर, अंबड) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नेमके प्रकरण काय ?


पीडित महिला ही मूळची नवी दिल्ली ( New Delhi) येथील असून, गेल्या काही वर्षांपासून ती नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. कुटुंबापासून दूर राहून उदरनिर्वाहासाठी बाहेर पडत संघर्ष करत असताना २०२० मध्ये रविवार कारंजा परिसरात भाजी विक्री करणाऱ्या रियाज शेख ( Riyaj Shaikh) याच्याशी तिची ओळख झाली. सुरुवातीला मैत्री, त्यानंतर प्रेम आणि पुढे लग्नाचे आमिष दाखवत संशयिताने तिचा विश्वास संपादन केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

धक्कादायक म्हणजे महिलेचा विश्वास पूर्णपणे जिंकल्यानंतर संशयिताने तिचे आधार कार्ड, पॅनकार्ड तसेच बँकेचे पासबुक स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यामुळे पीडित महिला पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहील, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे.

लॉजमध्ये नेऊन शारीरिक अत्याचार


आरोपानुसार पुढे संशयिताने तिला भद्रकाली परिसरातील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता, त्याने तिला इगतपुरी-हिरी परिसरातील एका धार्मिक स्थळी नेले. तेथे गुलाबजल असल्याचे सांगून संशयास्पद पाणी पाजल्याचाही गंभीर आरोप महिलेने केला आहे.

इतर धर्माच्या पुस्तकांचे वाचन अन्


फिर्यादीनुसार, त्यानंतर संशयिताने तिला अंबड ( Ambad )येथील स्वतःच्या घरी आणले. तेथे तिच्यावर दुसऱ्या धर्माच्या प्रार्थना ऐकण्याची सक्ती करण्यात आली. धार्मिक पुस्तके वाचण्यास भाग पाडले गेले. महिलेने याला विरोध केल्यानंतर तिच्या धार्मिक श्रद्धांवर आघात करण्याच्या उद्देशाने कपाळावर टिकली लावण्यास मनाई करण्यात आली. तिच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावल्या गेल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


दरम्यान, या संपूर्ण काळात संशयिताकडून मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून तिने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संशयित रियाज बुराउद्दिन शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम नाईक करत आहेत.

नाशिकमध्ये आधीच TCS कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरण चर्चेत आहे, त्यात आणखी एक प्रकरण समोर आल्याने नाशिक मध्ये खळबळ उडाली आहे.
Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण