Dr. Pankaj Bhoir : शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाचा तपास 'सीआयडी'कडे

दोषींवर कठोर कारवाई होणार - गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर


मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास तात्काळ 'सीआयडी' (CID) कडे वर्ग करण्यात आला असून, अंतिम वैद्यकीय अहवाल आणि व्हीसेरा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.विधान परिषदेत आमदार विक्रम काळे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते. या चर्चेत सदस्य संजय खोडके आणि अभिजित वंजारी यांनीही सहभाग घेतला. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या या संवेदनशील विषयावर प्रशासकीय गांभीर्य आणि तत्परता दाखवत सरकारने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा सविस्तर तपशील सभागृहासमोर ठेवला.



नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई


घटनेची सविस्तर पार्श्वभूमी सांगताना डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले की, वैजापूर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास अधिकारी स्थानिक पोलीस ठाण्याला कोणतीही पूर्वकल्पना किंवा परवानगी न देता खासगी वाहनाने वेरूळ येथे गेले होते. शासकीय नियमांचे हे स्पष्ट उल्लंघन असल्याने सरकारने यावर तात्काळ कडक पावले उचलली आहेत. या घटनेत झालेल्या वादातून शिक्षक सुरेश बोरसे यांना मारहाण झाली, ज्यात गंभीर जखमी होऊन औषधोपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून सरकारने तात्काळ संबंधित पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे आणि पोलीस अंमलदार बनगे यांना सेवेतून निलंबित केले आहे.



सर्व आरोपी जेरबंद; कायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू


या दुर्दैवी घटनेनंतर कायद्याची यंत्रणा अत्यंत गतीने फिरली असून, मृत सुरेश बोरसे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून ११ जून २०२६ रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकासह सर्वच्या सर्व ७ आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. मृताच्या शवविच्छेदन अहवालात त्यांना 'कोरोनरी आर्टरी डिसीज' (Coronary Artery Disease) असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी आणि रासायनिक विश्लेषणासाठी (व्हीसेरा) नमुने जतन करण्यात आले असून, हा अंतिम अहवाल येताच आरोपींविरुद्ध अधिक कडक कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.



बोरसे कुटुंबाला शासकीय मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक


शिक्षक सुरेश बोरसे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाची शासनाला पूर्ण जाणीव आहे. राज्य सरकार या कठीण काळात बोरसे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबाला योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विशेष चर्चा करून अत्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सभागृहाला सांगितले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे