BMC : रस्ते विकासकामे झाडांच्या मुळांवर

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची कामे जोरात असून ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे आता झाडांच्या मुळावर आली आहे. रस्त्यांचे रुंदीकरणा तसेच पदपथांच्या खोदकामांमध्ये जेसीबी (JCB) द्वारे खोदकाम करताना आसपास असलेल्या झाडांची पाळेमुळे कापली गेली असून आता हीच झाडे मुळे जमिनी घट्ट पकडू न शकल्यामुळे आता झाडांनी आपले अंग सोडून द्यायला सुरुवात केली आहे. चेंबूरमधील घटना याच प्रकारची असून या रस्ते क्रमांक ११चे सिमेंटीकरण करताना झालेल्या खोदकामामध्ये झाडांची पाळेमुळे कापली गेल्यामुळे हे पिंपळाचे झाड उन्मळून पडल्याचे बोलले जात आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) सन २०२३-२४ पासून रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाच्या टप्पा एकचे काम हाती घेण्यात आले आणि त्यानंतर मागील वर्षीपासून टप्पा दोनचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्ते कामांमध्ये होत असलेल्या खोदकामांमध्ये झाडांची पाळेमुळे कापली गेल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. याबाबतची पहिली घटना सन २०२५मध्ये माटुंगा पश्चिम येथील मनमाला टँक रोडवर घडली होती.



माटुंगा पश्चिम येथील मनमाला टँक रोडचे सध्या सिमेंट (Cement) काँक्रिटीकरणाचे काम सुरु असून या कामासाठी रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. या रस्ते खोदकामामध्ये स्टार सिटी सिनेमागृहाशेजारील आशियाना इमारती शेजारी पदपथावर असलेल्या झाडांची मुळेही तोडून टाकण्यात आली. त्यामुळे हे झाड कमकुवत बनले. या खोदकामामुळे झाडाचा तोल एका बाजुला कलंडला गेला आणि येथील इमारतीवर जावून हे कोसळले. या झाडांच्या बुध्यांमुळे इमारतीची संरक्षक भिंत तुटली आणि फांद्यांमध्ये इमारतीमधील खिडक्यांच्या ग्रीलही तुटल्या गेल्या आहेत. याबाबत स्थानिक रहिवाशांनी ही बाब महापालिका विभाग कार्यालय तसेच रस्ते विभागाच्या निदर्शनास आणून दिली. खोदकाम करता झाडांची मुळे सुरक्षित ठेवून काम केले जात नाही.


त्यानंतर ७ मार्च २०२५ रोजी दक्षिण विभागातील राजाभाऊ देसाई मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु असून या रस्त्यावर असलेल्या पिंपळ झाडांची मुळे या रस्ते कामांमध्ये तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. झाडांच्या मुळाभोवती एक मीटर बाय एक मीटरची जागा सोडून खोदकाम केले जावे, झाडांच्या बुंध्यांच्या परिसरात खोदकाम करण्यास बंदी असतानाही कंत्राटदाराकडून खोदकाम केले गेले असल्यामुळे या झाडांची मुळे खराब होवून भविष्यात किंवा पावसाळ्यात झाडाला गंभीर नुकसान होवू शकते. तसेच रस्त्यांचे काम करताना हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून रस्ते सुधारणा कामांमध्ये झाडांचे संरक्षण न केल्याने या पहिल्याच चुकीसाठी या रस्त्याचे काम करणाऱ्या जी.एल.कंस्ट्रक्शन.प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २० हजारांचा दंड आकारण्यात आला होता.



तसेच विलेपार्ले पूर्व येथील जिवा महाले रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरु असताना या रस्त्यांच्या विकास अंतर्गत पावसाळी पाणी वाहिनी टाकण्याचे अर्थात पर्जन्य जलवाहिनीचे बांधकाम करण्यात आले. त्याअंतर्गत कामे केली जात असतानाच १७ एप्रिल २०२५ रोजी येथील पेल्टोफोरम जाती एक झाड उन्मळून पडले. झाडाच्या खोडाभोवती खोलवर खोदकाम केल्याने हे झाड उन्मळून बाजुच्या सोसायटीच्या आवारात पडले होते.


त्यामुळे नव्याने रस्त्यांचा आणि रस्त्यांशेजारी पर्जन्य जलवाहिन्यांचे काम करताना झालेल्या खोदकामामध्ये आसपासच्या झाडांची मुळे तोडली गेली. चेंबूरमधील घटना याच रस्ते विकासाचा भाग असून याबाबत स्थानिक रहिवाशी शंतनू कुलकर्णी यांनी या रस्त्याचे आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या खोदकामांमध्ये झाडांची पाळेमुळे कुमकुवत केली गेली आहेत असा आरोप केला आहे. या रस्ते कामांमध्ये यासर्व झाडांचा सर्वे होणे आवश्यक असून छाटणी झाली असली तरी ती पूर्णपणे झाडे सुरक्षित नाही. वाढती बांधकामे आणि रस्ते विकास कामांमध्ये या झाडांची मुळे कुमकुवत बनलेली आहे. त्यामुळे रस्ते कामांमध्ये या झाडाची काळजी न घेतल्याने संबंधित कंत्राटदार आणि उद्यान अधिकारी यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ