Sachin Ahir : सचिन अहिर यांचा शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज

'उबाठा'ला पुन्हा मोठा धक्का; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी खेळी


 

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. उबाठा गटाचे खंदे शिलेदार आणि उपनेते सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून (Shinde) विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १ जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या अवघ्या २४ तास आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी राजकीय खेळी खेळल्याने उबाठा गटाला मुंबईत आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे.







माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत १३ मे २०२६ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी बुधवार, १ जुलै रोजी निवडणूक पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सोमवारी सभागृहात केली होती. या घोषणेनंतर महायुतीमध्ये या प्रतिष्ठेच्या पदासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या.विधान परिषद नियमानुसार, या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत मंगळवार, ३० जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत होती. या मुदतीपूर्वी नाट्यमय घडामोडी घडत सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी आपला अर्ज विधानमंडळ सचिवालयाचे सचिव डॉ. विलास आठवले यांच्याकडे सादर केला. मुंबईत आधीच खिळखिळ्या झालेल्या उबाठा गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे.


 


निवडणूक बिनविरोध होणार?


महायुतीमधील सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार विधान परिषदेच्या उपसभापती पदावर शिवसेनेचा दावा निश्चित होता. या पदासाठी माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा प्रबळ दावा मानला जात होता आणि पक्षांतर्गत मोठी रस्सीखेच सुरू होती. मात्र, शेवटच्या क्षणी सचिन अहिर यांनी अर्ज भरल्याने पक्षांतर्गत समीकरणांना पूर्णपणे नवे वळण मिळाले आहे.सध्या विधान परिषदेत सत्ताधारी महायुतीकडे ५६ आमदारांचे भक्कम संख्याबळ असून, काही अपक्ष आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे. महायुतीचे पारडे प्रचंड जड असल्याने आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाचा मोहरा फुटल्याने विरोधी पक्षांकडून (महाविकास आघाडी) या निवडणुकीत उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी