FIFA World Cup 2026 : जर्मनीला मोठा धक्का! पॅराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये केला पराभव; विश्वचषकातून धक्कादायक एक्झिट

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. चार वेळचा विश्वविजेता जर्मनीला पॅराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर झालेल्या थरारक पेनल्टी शूटआऊटमध्ये पॅराग्वेने इतिहास रचला. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या इतिहासात जर्मनीची पेनल्टी शूटआऊटमधील ही पहिलीच पराभवाची नोंद ठरली. (FIFA World Cup 2026)


सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये पॅराग्वेने आक्रमक खेळ करत जर्मनीवर दबाव निर्माण केला. ४५ व्या मिनिटाच्या सुमारास ज्युलिओ एन्सिसोने शानदार हेडरद्वारे गोल करत पॅराग्वेला १-० अशी आघाडी मिळवून दिली. कॉर्नरनंतर मॅटियास गालार्झाने दिलेल्या अचूक क्रॉसवर एन्सिसो पूर्णपणे अनमार्क राहिला आणि त्याने संधीचे सोनं केले. (FIFA World Cup 2026)



दुसऱ्या हाफमध्ये जर्मनीने पुनरागमन केले. ५४ व्या मिनिटाला फ्लोरियन विर्ट्झच्या अचूक क्रॉसवर काई हॅव्हर्ट्झने शानदार हेडर मारत बरोबरी साधली. स्पर्धेतील त्याचा हा तिसरा गोल ठरला. त्यानंतर जर्मनीने अनेक संधी निर्माण केल्या, मात्र पॅराग्वेचा गोलरक्षक ऑर्लांडो गिल भक्कमपणे उभा राहिला. अतिरिक्त वेळेत जोनाथन टाहने हेडरद्वारे गोल केला होता. मात्र व्हीएआर (VAR) तपासणीनंतर गोलरक्षकावर फाऊल झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा गोल रद्द करण्यात आला. हा निर्णय जर्मनीसाठी मोठा धक्का ठरला. (FIFA World Cup 2026)


त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटकडे गेला. पॅराग्वेचा गोलरक्षक ऑर्लांडो गिलने काई हॅव्हर्ट्झ आणि निक वोल्टेमाडे यांच्या पेनल्टी रोखत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे, जर्मनीचा जोनाथन टाह निर्णायक क्षणी पेनल्टी चुकला. त्यानंतर जोसे कॅनालेने अचूक पेनल्टी मारत पॅराग्वेला ४-३ असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. (FIFA World Cup 2026)


हा विजय पॅराग्वेच्या विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक मानला जात आहे. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या बाद फेरीत पॅराग्वेने याआधीच्या पाच सामन्यांत एकही गोल केला नव्हता. २००२ मध्ये जर्मनीकडून १-० असा पराभव स्वीकारलेल्या पॅराग्वेने तब्बल २४ वर्षांनंतर त्याच जर्मनीला विश्वचषकातून बाहेर फेकत जुन्या पराभवाचा बदला घेतला. (FIFA World Cup 2026)



दुसरीकडे, २०१४ मध्ये विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर जर्मनीची ही आणखी एक निराशाजनक मोहीम ठरली. २०१८ आणि २०२२ नंतर यंदाही संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यंदा बाद फेरीत प्रवेश करूनही जर्मनीला अखेरच्या ३२ संघांच्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.


आता पॅराग्वेचा पुढील सामना फ्रान्स आणि स्वीडन यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होण्याची शक्यता असून, उपांत्यपूर्व फेरीत आणखी एका बलाढ्य प्रतिस्पर्ध्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. (FIFA World Cup 2026)

Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा