Dance Bar: आर्केस्ट्रा बारमधील 'छमछम' बंद

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; डान्सबार प्रतिबंधक कायद्यातून पळवाटा शोधणाऱ्यांना दणका



मुंबई : डान्सबार प्रतिबंधक कायद्यातून पळवाटा शोधत, आर्केस्ट्रा बारच्या नावाखाली छुपे डान्सबार (Dance Bar) चालवणाऱ्यांना फडणवीस सरकारने दणका दिला आहे. मनोरंजन परवान्याच्या नावाखाली पळवाटा शोधून डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल; तसा नवा कायदा याच पावसाळी अधिवेशनात मंजुरीसाठी आणण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.



ठाणे जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या आर्केस्ट्रा बारबाबत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या चर्चेत आमदार अजय चौधरी, रईस शेख आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपप्रश्न विचारले. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने केलेल्या डान्सबार नियमन कायद्यानुसार ठाण्यातील एकाही डान्सबारला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, डान्सबार कायद्यातील अटी टाळण्यासाठी बारचालकांनी एक नवीन शक्कल लढवली होती. ते महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३३ चा वापर करून 'सार्वजनिक मनोरंजन नियमावली' अंतर्गत आर्केस्ट्रा बारचे परवाने मिळवत होते आणि तिथे डान्सबार चालवत होते. ही बाब सरकारच्या लक्षात आली असून, आता अशा पळवाटा रोखण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यातच (मुंबई पोलीस ॲक्ट) सुधारणा केली जात आहे.



यापुढे कोणत्याही बारमध्ये नृत्याची सादरीकरणे करायची असतील, तर त्यांना केवळ डान्सबार नियमन कायद्यांतर्गतच परवानगी घ्यावी लागेल. महाराष्ट्र पोलीस कायद्यातील इतर कलमांचा आडोसा घेऊन अशा परवानग्या दिल्या जाणार नाहीत. या नवीन कायद्यात वारंवार गुन्हे किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांविरोधात अत्यंत कठोर तरतुदी केल्या जात आहेत. विधि आणि न्याय विभागाशी सल्लामसलत करून, जे बारचालक वारंवार नियमांचे उल्लंघन करतील, त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद या सुधारित कायद्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.



डीजेच्या आवाजावरही मर्यादा



- तसेच, बारच्या आसपास होणारा डीजेचा दणदणाट आणि आवाजाच्या मर्यादेबाबत 'ध्वनी प्रदूषण नियमांनुसार' कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये गैरव्यवहार किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.
- विधेयकाच्या घटनात्मक वैधतेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "जनभावना आणि कायदा यात फरक असतो. आम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की कोणतीही कायदेशीर सुधारणा ही घटनात्मक तत्त्वांच्या आणि स्वातंत्र्याच्या चौकटीत बसेल. जनभावना तीव्र असल्या तरी त्या कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या असाव्यात, यामधील बारीक कायदेशीर रेषा ओळखूनच सरकार हा सुधारित कायदा आणत आहे."
- सुरुवातीला पाच वेळा हा कायदा रद्दबातल ठरवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानेही आता राज्याच्या डान्सबार प्रतिबंधक कायद्याला मान्यता दिली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.