Pakistan Airstrike on Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर मध्यरात्री हवाई हल्ला; ३५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी

कराची : कराचीतील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरात्मक कारवाईचा दावा करत पाकिस्तानने रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अफगाणिस्तानातील तीन प्रांतांवर भीषण हवाई हल्ले केले. पाकिस्तानने या कारवाईत तहरीक-ए-तालिबान (TTP) आणि जमात-उल-अहरार या दहशतवादी संघटनांच्या तळांवर निशाणा साधल्याचे म्हटले आहे. मात्र, अफगाणिस्तानकडून समोर आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये निवासी भाग उद्ध्वस्त झाले असून ३५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १०० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. (Pakistan Airstrike on Afghanistan)



निष्पाप नागरिक ठरले हल्ल्याचे बळी :


अफगाणिस्तानमधून समोर आलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश असल्याचे दिसून येते. अनेक जखमी बालकांवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अफगाण अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाईचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांनाच बसला आहे. (Pakistan Airstrike on Afghanistan)



कोणत्या भागांवर झाले हवाई हल्ले?


भारतीय वेळेनुसार रात्री सुमारे १२.३० वाजता पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतातील गियान, पक्तिया प्रांतातील चमकानी आणि कुनार प्रांतातील मरवारा या भागांवर बॉम्बहल्ले केले. या कारवाईत अनेक घरे आणि मशिदींचे मोठे नुकसान झाले. याहून धक्कादायक बाब म्हणजे, पहिल्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले असताना सुमारे २५ मिनिटांनी पुन्हा दुसरा हवाई हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दुसऱ्या हल्ल्यातही अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आणि जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. (Pakistan Airstrike on Afghanistan)



प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा :


हल्ल्यात जखमी झालेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "स्फोटाच्या वेळी परिसरात कोणताही लष्करी तळ किंवा सरकारी अधिकारी नव्हता. पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाईचा दावा करत असला तरी येथे केवळ सामान्य नागरिक राहत होते." (Pakistan Airstrike on Afghanistan)


चमकानी येथील आणखी एका जखमी नागरिकाने सांगितले की, तो काही महिन्यांपूर्वीच दुबईहून आपल्या गावी परतला होता. हल्ल्यात त्याच्या शेजाऱ्याचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पहिल्या स्फोटानंतर मदतीसाठी धावलेल्या लोकांवरच दुसरा हवाई हल्ला झाल्याने मोठी जीवितहानी झाली. (Pakistan Airstrike on Afghanistan)



पाकिस्तानचा दावा, अफगाणिस्तानचा तीव्र निषेध :


पाकिस्तानचे मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी या कारवाईत २५ दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला आहे. मात्र, अफगाणिस्तानने हा दावा फेटाळून लावत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत निष्पाप नागरिकांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. (Pakistan Airstrike on Afghanistan)



गेल्या नऊ महिन्यांतील वाढती जीवितहानी :


अफगाणिस्तानचा आरोप आहे की, पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांपासून 'दहशतवादविरोधी कारवाई'च्या नावाखाली सीमावर्ती भागांमध्ये सातत्याने हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवादी तळांपेक्षा सामान्य नागरिक, घरे, शाळा आणि रुग्णालयांचे अधिक नुकसान झाले असून गेल्या नऊ महिन्यांत अशा कारवायांमध्ये ५६५ हून अधिक अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (Pakistan Airstrike on Afghanistan)


या घटनेनंतर दोन्ही देशांतील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने संयम बाळगण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. (Pakistan Airstrike on Afghanistan)

Comments
Add Comment

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका

Quetta Gurdwara Demolition : बलुचिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वारा पाडला, शीख समाजात संताप; भारतातूनही तीव्र विरोध

क्वेटा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे असलेले सुमारे २०० वर्षे जुने ऐतिहासिक श्री

PM Narendra Modi Uzbekistan Visit : भारत-उझबेकिस्तान संबंधांना व्यापक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याची घोषणा

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्ज़ियोयेव यांच्यासोबत

India-Nepal Flood Relief : भारताचे चौथे विमान ११ टन मदत सामग्री घेऊन नेपाळमध्ये पोहोचले

काठमांडू : भारताचे चौथे विमान रविवारी मदत सामग्रीची चौथी खेप घेऊन काठमांडूमध्ये पोहोचले आणि आपत्तीग्रस्त देश