Ketan Agarwal Murder : एका पँटने उघडलं केतनच्या हत्येचं गुपित, चेतनच्या कपड्यांवरून तपासाला नवे वळण

पुणे :  पुण्यातील (Pune) उद्योगपती केतन अग्रवाल हत्या (Ketan Agarwal Murder) प्रकरणात तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोलिसांनी चेतनच्या पँटचा उल्लेख केला. त्यानंतर या पुराव्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन्ही आरोपींची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, तपासासाठी काही महत्त्वाचे पुरावे अद्याप जप्त करायचे आहेत. त्यामध्ये चेतन चौधरीची पँटही महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या कपड्यांमधून तपासासाठी आवश्यक पुरावे मिळण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा दावा आहे.



चेतनच्या वकिलांचा विरोध


दुसरीकडे, चेतन चौधरीच्या वकिलांनी पोलिसांच्या मागणीला विरोध केला. हुडी, मोबाईल आणि वाहन यांसारख्या वस्तू आधीच जप्त करण्यात आल्या असताना पँट त्याचवेळी का जप्त करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी न्यायालयात उपस्थित केला. पोलिसांनी मागणी केली असती तर संबंधित कपडेही तपासासाठी उपलब्ध करून दिले असते, असा दावाही बचाव पक्षाने केला.


बचाव पक्षाने युक्तिवाद करताना घटनास्थळी सीन रिक्रिएशन पूर्ण झाले असून अनेक पंचनामेही झाले आहेत. त्यामुळे पुन्हा दीर्घ पोलीस कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.



दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून सर्व पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. कपडे, डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


 
Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि