Mumbai Muharram : पेनकिलरच्या नावाखाली विषारी कॅप्सूल वाटप; झिंक फॉस्फाइड किती घातक?

मुंबई : मुंबईतील मोहरम जुलूस दरम्यान लोकांना झिंक फॉस्फाइड (Zinc Phosphide) या अत्यंत विषारी रसायनाने भरलेल्या Capsule वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कॅप्सूलना पेनकिलर आणि Immunity Booster असल्याचं सांगून लोकांमध्ये वाटप करण्यात आलं. मात्र, त्याचं सेवन केल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) फैयाज प्रेमजी या आरोपीला अटक केली आहे. तो पुण्यातील विमाननगर (Viman Nagar) परिसरातील रहिवासी असून त्याच्याकडून तब्बल १४ हजार विषारी कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. तपासादरम्यान आरोपीने ३० हजार रिकाम्या कॅप्सूल आणि १०० किलो Zinc Phosphide ऑनलाइन मागवल्याचंही उघड झालं आहे.



तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपीने २०२५ मध्ये इराण (Iran) आणि इराक (Iraq) दौरा केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा International Connection आहे का, याचा तपास यंत्रणा करत आहेत.



झिंक फॉस्फाइड (Zinc Phosphide) म्हणजे काय?


झिंक फॉस्फाइड (Zinc Phosphide) हे उंदीर मारण्यासाठी (Rodenticide) वापरलं जाणारं अत्यंत विषारी रसायन (Chemical) आहे. हे शरीरात गेल्यानंतर पोटातील अॅसिडशी (Stomach Acid) प्रतिक्रिया होऊन Phosphine Gas तयार करते. हा वायू शरीरासाठी अत्यंत घातक असून हृदय (Heart), फुफ्फुसे (Lungs), यकृत (Liver), मूत्रपिंड (Kidneys) आणि मेंदू (Brain) यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम करू शकतो.



शरीरावर होणारे परिणाम


- शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजन (Oxygen) वापरण्याची प्रक्रिया बिघडते.


- हृदयाचे ठोके (Heartbeat) अनियमित होऊ शकतात.


- रक्तदाब (Blood Pressure) अचानक कमी होऊ शकतो.


- श्वास घेण्यास त्रास (Breathing Difficulty) होऊ शकतो.


- अनेक अवयव निकामी (Multiple Organ Failure) होण्याचा धोका वाढतो.



Zinc Phosphide विषबाधेची (Poisoning) लक्षणे


- सतत उलट्या (Vomiting)


- तीव्र पोटदुखी (Severe Abdominal Pain)


- अस्वस्थपणा (Restlessness)


- चक्कर येणे (Dizziness)


- उलटीतून तीव्र वास (Strong Odour in Vomit)


या प्रकरणामुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली असून, पोलिस या संपूर्ण रॅकेटचा आणि संभाव्य International Link चा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून