Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत 'मिशन ग्रीन मान्सून'चा शुभारंभ,लोकसहभागातून हरित नाशिक साकारणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Nashik : प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्या सक्रिय लोकसहभागातून हरित नाशिक साकारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ २८ जून रोजी मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अभियानात प्रत्येक नाशिककराने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 'मिशन ग्रीन मान्सून' ('Mission Green Monsoon') अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित जिल्हास्तरीय समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, वनाधिकारी रणदिवे, मनपा उद्यान निरीक्षक विवेक भदाणे, वृक्षमित्र शेखर गायकवाड, चंदू पाटील, जगबीर सिंग, मनोज साठे, वैभव देशमुख, मनीष बाविस्कर, भारती जाधव, राम खुर्दळ, भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, सागर बैरागी, गौरव देशमुख, सोनल दगडे यांच्यासह शहरातील पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.



जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या देवराई (फाशीचा डोंगर) या ठिकाणी वृक्षमित्र शेखर गायकवाड यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करण्यात आली असून आजही या परिसरात वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. २८ जून २०२६ रोजी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत 'मिशन ग्रीन मान्सून' अंतर्गत या ठिकाणी दोन हजार झाडांचे रोपण करण्यात येणार आहे.


त्यासोबतच शिंदे ग्रामपंचायतीचे सरपंच बाजीराव जाधव यांनी देखील दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, २८ जून रोजी ग्रामपंचायत परिसरात दोन हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध भागांतून वृक्ष लागवडीसाठी अनेक नागरिकांनी मागणी केली असून, या जागांवर महानगरपालिका प्रशासनामार्फत रोपे पुरवण्यात येणार आहेत. अशाप्रकारे येत्या रविवारी सुरू होणाऱ्या 'मिशन ग्रीन मान्सून'च्या माध्यमातून सुमारे पाच ते सहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.



"महानगरपालिका क्षेत्रात व परिसरात सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी योग्य जागा उपलब्ध असेल आणि अशा परिसरातून नागरिकांनी मागणी केली, तर त्यांना झाडे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याकरिता दिलेला क्यु आर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपली मागणी नोंदवायची आहे. जागा योग्य असल्यास प्रशासनामार्फत त्या ठिकाणी मोफत झाडे पुरवली जातील. तरी या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन 'हरित नाशिक' चळवळीला बळ द्यावे. असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग