BMC News : महापालिका सभागृह आता भरणार दर सोमवारी आणि गुरुवारी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभा या महिन्याला चार किंवा पाच घेण्याची प्रथा असली तरी या महापालिकेत अभ्यासू नगरसेवकांना आपल्या प्रभागांतील समस्या मांडण्यास कमी वेळ मिळत असल्याने यासाठी सभागृहाचे कामकाज काही दिवस वाढवण्यात यावे अशी मागणी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांकडून केली जात आहे. त्यामुळे यापुढे महापालिका सभागृहाच्या कामकाजासाठी कायमस्वरुपी निश्चित दिवस करण्याचा विचार असून यासाठी दर सोमवारी आणि गुरुवारी महापालिका सभा घेण्यावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.


मुंबई महापालिकेच्या मागील सभेमध्ये काँग्रेसचे अश्रफ आझमी सभागृहाच्या कामकाजाचे दिवस वाढवण्याची मागणी केली. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी अनेक नगरसेवकांना सभागृहात बोलण्यास संधी मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. आपण महासभा चार ते पाच वेळा करतो. त्यातच प्रभाग समिती, विशेष समिती आणि वैधानिक समित्यांच्या बैठकांच्या तारखांचाही घोळात घोळ असतो. यापेक्षा सभागृहाच्या कामकाजाचे दोन ते तीन दिवस वाढवा. एखाद दिवस वाढवून ठरावाच्या सूचनांसाठी दिला जावू शकतो, हरकतीच्या दिवसांसाठी एक दिवस दिल्यास नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडता येवू शकतात. त्यामुळे एक दिवस हरकतीच्या मुद्दयांसाठी राखून ठेवला जावा अशी सूचना करताना प्रभाग समित्यांच्या बैठकांबाबत महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विचार केला जावा अशी विनंती केली.


तर उबाठाचे यशोधर फणसे यांनी पूर्वी महापालिका सभा या सोमवारी व गुरुवारी भरायच्या. तर बुधवारी स्थायी समितीची बैठक असायची. त्यामुळे लोकांना नगरसेवकांच्या बैठकींची माहिती असायची अणि त्याप्रमाणे ते शाखेवर भेटायला यायचे. त्यामुळे पुन्हा एकदा सोमवार आणि गुरुवारी या दिवशीच महापालिकेच्या सभांचे आयोजन करण्याची मागणी त्यांनी केली.



शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच प्रभाग समितीच्या बैठका घ्याव्यात. तसेच या महिन्याचे सभागृह संपल्यानंतर पुढील महिन्याचा कार्यक्रम ठरवायला हवा असे सांगितले.


विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी यापूर्वी जेवढे म्हणून महापालिका चिटणीस होवू गेले त्यांचा प्रभाग समित्यांच्या बैठकांसंदर्भात समन्वय असायचा. तसा समन्वय राखला गेला पाहिजे असे सांगितले.


यावर महापौर रितू तावडे यांनी, प्रभाग समितीच्या विषयासंदर्भात सचिव विभागाने महिन्याच्या सुरुवातीला व्हर्चुअल बैठक घ्यावी, त्यांचे वेळापत्रक ठरवणे योग्य होईल, हे वेळापत्रक त्याप्रमाणे निश्चित केले पाहिजे असे निर्देश दिले.



नियोजन सोमवार तसेच गुरुवारचेच..


दरम्यान, सभागृहनेत्यांनी विरोधी पक्षाला विश्वासात घेत यापुढील महापालिका सभा या तीन आठवडे सोमवार आणि गुरुवारीच घेण्यात येईल अशाप्रकारे नियोजन करण्याचा विचार केला आहे. त्यानुसार, पुढील जुलै महिन्यात या सभा आता दर सोमवारी व गुरुवारीच होणार आहे.


त्यादृष्टीकोनातून जुलै महिन्यातील सभा या १३, १६, २० व २३ या तारखेला घेण्याचा निश्चित केले आहे. महापालिका सचिव विभागाच्या एका निवृत्त विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विभागाच्यावतीने सोमवारी व गुरुवारचेच नियोजन असते. परंतु बऱ्याचदा सत्ताधारी पक्षाचे कार्यक्रम, सुट्टया या पाहून त्यात बदल केला जातो.



सभागृहाला पहिली सभा बंधनकारक…


महापालिका अधिनियम ११८८नुसार महिन्याला एक सभा बंधनकारक असून ज्या सभेचे नोटीफिकेशन झाले आहे, ती सभा रद्द करता येत नाही. या व्यतिरिक्त महापौर या आपल्या अधिकारात कितीही सभा घेवू शकतात. त्यामुळे महिन्याला दहा ते पंधरा सभाही त्यांना घेण्यास कुठेही बंधन नाही. बंधन आहे ते पहिली सभा रद्द न करणे यालाच,असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)