Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून धावणार १५० विशेष ट्रेन

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये लाखो भाविक, पर्यटक येणार आहेत त्यादृष्टीने त्यांची येण्याजाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे विभागाने पाऊल उचलले आहे. कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वणीच्या काळात नाशिकसाठी देशभरातून १५० हून अधिक कुंभ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक अमृत स्नानालगतच्या (शाही स्नान) चार दिवसांत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी उत्तर भारतातून ७५ आणि दक्षिण भारतातून ७५ गाड्या दररोज धावतील.


गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील प्रथम आणि द्वितीय पर्वणी एकाच दिवशी अनुक्रमे दोन ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी आहे. नाशिकमध्ये तृतीय पर्वणी ११ सप्टेंबर रोजी तर, त्र्यंबकेश्वर येथे १२ सप्टेंबर रोजी आहे. मुख्य पर्वणीच्या काळात विशेष रेल्वेगाड्यांची सर्वाधिक संख्या ठेवली जाणार आहे. कुंभमेळ्यादरम्यान तीन कोटीहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष गाड्यांमधून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील नाशिकरोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे.



उत्तरेकडून ७५ आणि दक्षिणेकडून ७५ गाड्या


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुख्य दिवसांदरम्यान देशाच्या विविध भागांतून नाशिकला येणाऱ्या आणि तिथून परतणाऱ्या १५० हून अधिक विशेष गाड्या चालवण्याची भव्य योजना रेल्वे प्रशासनाने तयार केली आहे, अशी माहिती नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी दिली. सिंह म्हणाले, "अमृत स्नानाच्या चार मुख्य दिवसांदरम्यान, भाविकांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी दररोज उत्तरेकडून ७५ आणि दक्षिणेकडून ७५ गाड्या चालवल्या जातील."


कुंभमेळ्यादरम्यान तीन कोटींहून अधिक प्रवाशांची ये-जा होण्याची शक्यता रेल्वेने वर्तवली आहे. नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे साधू आणि भाविकांकडून पवित्र स्नानविधी पार पडतात; या अमृत स्नानाच्या दिवसांत रेल्वेची वर्दळ सर्वाधिक असेल अशी अपेक्षा आहे. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन घाटांची संख्याही वाढवण्यात आली आहे. सिंह म्हणाले, "सध्या या भागातील नाशिक रोडसह पाच प्रमुख रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. विशेष गाड्यांनी येणाऱ्या भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूप लाइन्स, पादचारी पूल (फूट ओव्हरब्रिज) आणि 'होल्डिंग एरिया' (प्रवासी थांबण्याची जागा) यांसारख्या प्रगत सुविधा उभारल्या जात आहेत." (Nashik Simhastha Kumbh Mela )



कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन आणि नाशिकरोड या मुख्य रेल्वे स्थानकाचा ताण कमी करण्यासाठी उत्तर भारतातून येणाऱ्या कुंभ विशेष रेल्वे गाड्या ओढा, कसबे सुकेणे आणि खेरवाडी स्थानकांवर थांबविण्याचे निश्चित झाले आहे. तर दक्षिण भारतातून येणाऱ्या विशेष गाड्या देवळाली आणि नाशिकरोड स्थानकांवर थांबतील. याबाबतची माहिती नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून देण्यात आली. कामाख्या, हावडा, पाटणा, दिल्ली, जयपूर, बिकानेर, नांदेड या प्रमुख स्थानकांवरून आणि गुजरात, तामिळनाडू या राज्यातून येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या तसेच स्थानिक मेमू सेवा वेगवेगळ्या स्थानकांवरून चालविल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग