Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार



नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये किमतीचे दोन लाख किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जाळले जाणार आहेत. गृहमंत्री अमित शाह (AmitShah) शुक्रवारी 'नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर' (ENCORE) च्या १० व्या बैठकीदरम्यान ड्रग्ज नष्ट करण्याच्या पंधरवड्याची (Fortnight) सुरुवात करतील. यासोबतच, शाह आगामी तीन वर्षांसाठी अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार केलेले 'व्हिजन डॉक्युमेंट' देखील जारी करतील.



गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, शुक्रवारी एनकोर्डच्या बैठकीत अंमली पदार्थांच्या समस्येशी निपटण्यासाठी सुरू असलेल्या सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नांचा आढावा घेतला जाईल. मोदी सरकारचे ड्रग्जविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण असून, अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे की, भारतात एक ग्रॅमही ड्रग्ज येऊ दिले जाणार नाही आणि भारतातून दुसऱ्या देशातही एक ग्रॅम ड्रग्ज जाऊ दिले जाणार नाही.



एनकोर्डची स्थापना याच उद्देशाने करण्यात आली आहे. हायब्रिड मोडमध्ये बोलावलेल्या या बैठकीत ४४ केंद्रीय मंत्रालयांचे प्रमुख आणि ड्रग्जविरुद्ध काम करणाऱ्या एजन्सींचे शंभरहून अधिक अधिकारी उपस्थित राहतील. जप्त केलेले ड्रग्ज नष्ट करण्यासाठी संपूर्ण देशात पंधरवडा साजरा केला जातो, ज्यामध्ये विविध ठिकाणी ड्रग्ज जाळण्याचे काम केले जाते

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे