BMC News : महापालिका सभागृहात उंदराचा प्रवेश, नगरसेवकांमध्ये घबराट

मुंबई : एका उंदराने मुंबई महापालिका सभागृहातील नगरसेवकांची झोप उडवली. गुरुवारी रात्री ९वाजता महापालिका सर्वसाधारण सभेत एका उंदराने प्रवेश केला आणि नगरसेवकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. सभागृह नेते गणेश खणकर यांनी मात्र ही घटना सकारात्मक घ्या, पाऊस येणार,अशी आशा व्यक्त केली.



महापालिका सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी सुरू झाली. रात्री ९ वाजता भाजप नगरसेविका प्रिती सातम या हरकतीचा मुद्दा मांडण्यासाठी उभ्या होत्या.. त्यांनी मुद्दा मांडण्यास सुरुवात करताच कॉग्रेसचे नगरसेवक जिथे बसले होते तिथे उंदराने प्रवेश केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर सभागृह नेते खणकर एका विषयावर मत व्यक्त करत असताना, पुन्हा आजूबाजूला बसलेल्या नगरसेtags


वकांची हालचाल सुरू झाली. महिला नगरसेविकांमध्ये घबराट पसरली. कोण म्हणाले पाय वर घेऊन बसा, तर कोण गेला का बघा, म्हणत खिल्ली उडवत होते. समोरून 'पिंजरा आणा, पिंजरा'असा आवाज एका नगरसेवकाने दिला. त्यावर खणकर यांनी विरोधी पक्षांना सकारात्मक घेण्याचा सल्ला दिला. "मी खूप ओपन माइंड माणूस आहे. जे घडते त्यामुळे मी व्यथित होत नाही. परवा आपण पाण्याचे निवेदन दिले, सगळ्यांनी भाषणे केली आणि चमत्कार झाला रात्री पाऊस आला. त्यामुळे सकारात्मक घ्या. गणपती बाप्पाचे वाहन आहे. आता समजून जा की आज किंवा उद्या, छप्पर फाड के बारिश, होणार," असे सांगून उंदराच्या पुढील चर्चेला विराम दिला.

Comments
Add Comment

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून