Chandrashekhar Bawankule : शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा


मुंबई : राज्यातील वीर जवान आणि अधिकारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या वीर माता, वीर पत्नी किंवा अधिकृत वारसांना उदरनिर्वाहासाठी शासनाकडून शेतीसाठी जमीन दिली जाते. मात्र, ही जमीन त्यांच्या नावावर करताना मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fandvis)यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना दिली.



माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे(chandrashekhar bavankule) म्हणाले, "शहीद कुटुंबांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून, आता महसूल खात्याची जमीन वीर माता किंवा पत्नीच्या नावे करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही."


मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णयांची माहिती देताना बावनकुळे यांनी सांगितले की, प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान येथे पर्यटकांसाठी पार्किंगची मोठी समस्या होती. यासाठी माथेरान नगरपालिकेच्या मागणीनुसार महसूल विभागाची ५ एकर जागा पार्किंगसाठी मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय, नागपूर जिल्ह्यातील 'गादा' येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.




ठाणे जमीन गैरव्यवहारावर स्पष्टीकरण


माजी आमदार नरेंद्र मेहता(narendra mehata) यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आदिवासी जमीन प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकाऱ्यांकडून ३ प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत. यात नियमांनुसार झालेली प्रक्रिया, सुनावणीची संधी आणि तांत्रिक त्रुटी तपासल्या जात असून सरकार यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

'ऑपरेशन टायगर'शी भाजपचा संबंध नाही
शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींवरून उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, 'ऑपरेशन टायगर'शी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. आपला पक्ष कसा चालवायचा किंवा वाढवायचा हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी