Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishawas Nangare Patil) यांची नागपूर शहराच्या (Nagpur City) पोलीस आयुक्तपदी नियुक्ती (Police Commissioner) करण्यात आली आहे. सध्या नागपूरचे पोलीस आयुक्त असलेले डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.


विश्वास नांगरे पाटील हे आपल्या धडाडीच्या आणि शिस्तप्रिय कामकाजासाठी राज्यभर ओळखले जातात. विविध जिल्ह्यांमध्ये काम करताना त्यांनी गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाया केल्या आहेत. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान दाखवलेल्या धैर्यामुळे त्यांची देशभरात विशेष ओळख निर्माण झाली होती.



नागपूर शहराची जबाबदारी स्वीकारताना त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हाने असणार आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, आर्थिक फसवणुकीचे प्रकार आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे विषय असतील. विशेषतः तरुणांमध्ये वाढत असलेल्या एमडी ड्रग्जच्या विळख्याविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Nagpur Police Commissioner)


नागपूर हे वेगाने विकसित होणारे शहर असल्याने गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. त्यामुळे पारंपरिक गुन्ह्यांसोबतच सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.



दरम्यान, नागपूर पोलीस दलात इतरही काही बदल करण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांची नागपूर शहरात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये यापूर्वी काम केलेल्या रमेश धुमाळ यांना या भागाचा अनुभव असल्याचे सांगितले जात आहे.


विश्वास नांगरे पाटील येत्या काही दिवसांत पदभार स्वीकारणार असून त्यांच्या नियुक्तीकडे राज्यातील पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Comments
Add Comment

Pune Rain : पुणेकरांनो सावध व्हा! मुठा नदीने धारण केले रौद्ररूप; धरण साखळी पूर्ण भरली, सखल भागात सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे शहर आणि परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम

Khopoli Accident : ५० फूट खोल दरीत कोसळली भरधाव कार झाडात अडकली, अन् पुढच्याच क्षणी...खोपोलीत थरारक घटना!

खोपोली : खोपोलीतील गारमाळ रस्त्यावर सोमवारी दुपारी एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार

Kolhapur : आरोपी फरार; कोल्हापुरातील बाळूमामांच्या मंदिरात ६० कोटींचा घोटाळा

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध संत बाळूमामा मंदिरात तब्बल ६०

Private Vehicle Police Sticker : खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहून चमकोगिरी करणे महागात पडणार

- विशेष तपासणी करून कारवाई होणार; वाहतूक विभागाचे राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र मुंबई : आपल्या खासगी

Women Heart Attack Video : 'अचानक छातीत दुखू लागलं... अन् पुढच्या 5 मिनिटांत जे घडलं ते थक्क करणारं! Video Viral

पुणे बसस्थानकावर महिलेला हार्ट अटॅक; महिला कंडक्टर बनली देवदूत पुणे: पुण्यातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकावर एक

Maharashtra Karjmafi 2026 : ४ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ७ हजार कोटी जमा होणार

मुंबई : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पात्र ठरलेल्या