CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात ॲमेझॉनसाठी गुंतवणुकीच्या व्यापक संधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांची मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट


मुंबई, दि. २४ : डेटा सेंटर क्षेत्रात महाराष्ट्राने देशात अग्रस्थान प्राप्त केले असून, या क्षेत्राच्या विस्तारासाठी राज्यात अत्याधुनिक आणि अनुकूल परिसंस्था विकसित करण्यात येत आहे. डेटा सेंटर्सबरोबरच आरोग्य, तंत्रज्ञानाधारित पायाभूत सुविधा, डिजिटल नवोपक्रम तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांमध्येही मोठ्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ घेत  ने महाराष्ट्रात आपली गुंतवणूक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी (Andy Jassy) यांच्यासोबत झालेल्या भेटीत राज्यातील गुंतवणुकीच्या संधी, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणि भविष्यातील विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र हे उद्योग, तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र बनत असून, जागतिक कंपन्यांसाठी राज्यात अनुकूल वातावरण उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देशातील अग्रणी राज्य आहे राज्याची अर्थव्यवस्था ६६० अब्ज डॉलर्स इतकी आहे. राज्याने २०३० पर्यंत ' वन ट्रिलियन डॉलर' अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी अर्धे अधिक उद्दिष्ट राज्याने पार केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगावर आधारित विविध प्रयोग राज्याच्या शासन व्यवस्थेमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे निश्चितच नागरिकांना सुलभ आणि सहजरित्या शासकीय सेवांचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यवस्थांची उभारणी करण्यात येत आहे.



कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगाने रोजगाराच्या स्वरुपामध्ये बदल होत आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र कौशल्य विकासामध्ये ॲमेझॉनसोबत काम करण्यास इच्छुक आहे. यासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आहे. या क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगावर आधारित कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात महाराष्ट्रात आवश्यक असलेली परिसंस्था विकसित करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे डेटा सेंटर विकसित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधांचा विस्तार करीत आहे. तसेच ‘सार्वजनिक क्लाउड धोरण’ लागू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. यामध्ये यापूर्वीच ॲमेझॉनसोबत शासनाने पब्लिक क्लाऊडमध्ये काम केले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी राज्याने स्वतःची डेटा सेंटर धोरण जाहीर केले आहे. ज्यामध्ये ' ग्रीन डेटा सेंटर' चा समावेश आहे. डेटा सेंटरसाठी पारंपारिक ऊर्जेच्या उपयोगाऐवजी अपारंपारिक क्षेत्रातून ऊर्जेचा उपयोग करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रीन डाटा सेंटरसाठी राज्याने सवलतीपण दिल्या आहेत.

नवी मुंबई येथे मेडिसिटी उभारण्यात येत आहे. या ठिकाणी संपूर्ण उपचार पद्धतीची साखळीच निर्माण करण्यात येणार आहे. अशा मेडिसिटीच्या माध्यमातून ॲमेझॉनला आरोग्य क्षेत्रातही गुंतवणूक करण्याची संधी आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Comments
Add Comment

Tribal Hostel Age Limit Removed : आदिवासी वसतीगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द

- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली