Nashik : काळाचा घाला ! मडकीजांब येथे विजेचा धक्का लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

Nashik : दिंडोरी (Dindori) तालुक्यातील मडकीजांब येथे विजेचा धक्का लागून २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.



नेमकं काय घडलं ?


मडकीजांब येथे सोमवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे परिसरात ओल निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळी युवकाची आजी वीज खांबाजवळ गेली असता, जमीन ओलसर असल्याने तिला विजेचा झटका बसला. त्यावेळी भुषण गायकवाड यांच्या आईने वृद्ध महिलेला बाजूला नेले. दरम्यान, भुषण गायकवाड तेथे आला असता त्यालाही जमिनीतून विजेचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. ग्रामस्थांनी तातडीने त्याला दिंडोरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.



महावितरणचा हलगर्जीपणा नडला ?


भुषण गायकवाड हा होतकरू युवक होता. तो दिंडोरी येथील एका फायनान्स कंपनीत कार्यरत होता. कष्ट करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अकाली निधनाची बातमी मडकीजांब तसेच दिंडोरी शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.या प्रकरणी महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे भुषण गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित वीज खांबाबाबत यापूर्वीही महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायतीनेही पत्रव्यवहार करून समस्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.



वणी येथेही एकाने जीव गमावला


दरम्यन वणी येथे देखील दोन दिवसांपूर्वी अशी घटना घडली होती. लग्नाचा मंडप काढण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मंडपाचा लोखंडी पाईप काढताना तो पाईप वरून गेलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने ही घटना घडली. वणी येथील कृपा हॉस्पिटल परिसरात राहणारे नंदलाल गावित यांच्या मुलाच्या लग्नाचा कार्यक्रम दि. १८ रोजी पार पडला होता. यासाठी त्यांच्या घरासमोर मंडप उभारण्यात आला होता. हा मंडप काढण्यासाठी शिवरे येथील मंडप व्यावसायिक ऋषीकेश तुकाराम मत्सागर (वय २७, रा. शिवरे) हे दि. २० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गावित यांच्या घरासमोर गेले होते. मंडप काढत असताना लोखंडी पाईप काढण्याच्या वेळी तो पाईप वरून गेलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात आला. त्यामुळे ऋषीकेश यांना जोरदार विजेचा धक्का बसून ते जमिनीवर कोसळले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी