Tuesday, June 23, 2026

Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

Nashik Rain Update : हवामान विभागाने आज नाशिक शहरासह जिल्ह्याला येल्लो अलर्ट दिला होता त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाने आज हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना (Nashik) मोठा दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा पसरला आहे.

शहरातील सीबीएस, शालिमार, सिडको, त्र्यंबकरोड यासह विविध भागांत आज पाऊस कोसळला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) रस्त्यावरील पादचाऱ्यांची आणि वाहनधारकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, मखमलाबाद, आडगाव, वरवंडी, म्हसरूळ आणि नांदूर-मानूर परिसरात पावसाने अक्षरशः जलधारा बरसवल्या. काही ठिकाणी गारांच्या सरींनीही हजेरी लावत वातावरणात वेगळीच रंगत आणली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यांवर धावपळ उडाली, तर नागरिकांनी आसऱ्यासाठी सुरक्षित ठिकाणांचा शोध घेतला.

पावसाच्या सततच्या सरींनी शहरातील अनेक रस्ते, चौक आणि सिग्नल परिसर जलमय झाले. रस्त्यांवर साचलेल्या पाण्याने जणू लहान तळ्यांचे रूप धारण केले होते. दुचाकीस्वार, पादचारी आणि वाहनचालकांना या जलसाठ्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. दरम्यान जिल्यात देखील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा यामुळे सुखावला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >