Nashik : येवला तालुक्यातील पारेगाव येथे अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर (Revenue Squad) सराईत गुन्हेगारांनी अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भ्याड हल्ल्यात निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संतोष आठवले आणि वैभव भड हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सोमवार (दि. २२) रोजी येवला तालुका तलाठी संघ व महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने 'एकदिवसीय कामबंद आंदोलन' करण्यात आले. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना तडीपार करावे, अशी आक्रमक मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मागील कार्यकाळातील एकही पैसा अखर्चित नाही. धाराशिव : गेल्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात 'खासदार निधी' (MPLADS) आणि त्याच्या वापरावरून मोठा गदारोळ निर्माण ...
कारवाईसाठी गेलेल्या पथकावर अमानुष हल्ला
शनिवार, २० जून रोजी पारेगाव गावाजवळील तळ्यात अवैध मुरूम उत्खनन (Illegal Murum mining) आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, तलाठी संतोष आठवले व वैभव भड यांचे पथक दुपारी घटनास्थळी पाहणीसाठी गेले. पथकाने तेथे उपस्थित असलेल्यांना गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने संबंधित संशयितांनी दादागिरी करत शासकीय पथकावर अचानक हल्ला चढवला आणि त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल २०२६ मधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर, मुख्य प्रशिक्षक स्टीफन ...
पोलीस बंदोबस्ताशिवाय कारवायांवर बहिष्कार
या घटनेमुळे ग्रामीण भागात क्षेत्रिय स्तरावर काम करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. यापुढे जिल्ह्यात कुठेही अवैध गौण खनिजावर कारवाई करायची असल्यास शासकीय वाहन, चोख पोलीस बंदोबस्त आणि वरिष्ठ अधिकारी सोबत असल्याशिवाय महसूल कर्मचारी कारवाईसाठी जाणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा संघटनेच्या वतीने आज तहसील आवारात झालेल्या निषेध सभेत घेण्यात आला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; एसटी महामंडळाकडून ८ हजार ३०० बसची खरेदी मुंबई : राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक, मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल अथवा अवैध ...
आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा जिल्हा बंद पाडू
"हल्ला करणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करून त्यांना तातडीने तडीपार करण्यात यावे. अद्याप फरार असलेल्या आरोपींना पुढील ७ दिवसांत अटक न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडून 'जिल्हा बंद' पाडण्यात येईल."
दत्तात्रय गिरी, अध्यक्ष - येवला तालुका तलाठी व ग्राम महसूल अधिकारी संघटना






