Crude Oil Prices : होर्मुझमधील तणावाचा परिणाम; कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली असून त्याचा परिणाम इंधन दरांवरही दिसून येत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) ताज्या घडामोडींमुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे २३ जून २०२६ रोजी देशभरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. (Crude Oil Prices)


काही दिवसांपूर्वी शांतता करारामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली होती. मात्र पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे पुन्हा एकदा तेलाचे दर वधारले आहेत. मार्च २०२६ मध्ये झालेल्या संघर्षानंतर तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी पेट्रोलच्या दरात ७.५० रुपये आणि डिझेलच्या दरात ७.६० रुपये प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. (Crude Oil Prices)



देशातील प्रमुख महानगरांतील इंधन दर (प्रति लिटर)


देशातील मोठ्या शहरांमध्ये इंधनाचे दर उच्च पातळीवर कायम असून बेंगळुरूमध्ये किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे.


दिल्ली : पेट्रोल १०२.१२ रुपये | डिझेल ९५.२० रुपये
मुंबई : पेट्रोल १११.२१ रुपये | डिझेल ९७.८३ रुपये
कोलकाता : पेट्रोल ११३.४७ रुपये | डिझेल ९९.८२ रुपये
चेन्नई : पेट्रोल १०७.७६ रुपये | डिझेल ९९.६६ रुपये
बेंगळुरू : पेट्रोल १११.६८ रुपये | डिझेल ९८.८० रुपये (Crude Oil Prices)



महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील ताजे दर : 


महाराष्ट्रातही इंधनाचे दर शंभरीपार कायम असून अमरावती आणि कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.


मुंबई : पेट्रोल १११.१८ रुपये | डिझेल ९७.८३ रुपये
पुणे : पेट्रोल ११२.०४ रुपये | डिझेल ९८.६८ रुपये
नागपूर : पेट्रोल १११.८० रुपये | डिझेल ९८.४८ रुपये
नाशिक : पेट्रोल ११२.४४ रुपये | डिझेल ९९.०७ रुपये
ठाणे : पेट्रोल १११.३८ रुपये | डिझेल ९८.०० रुपये
अमरावती : पेट्रोल ११२.८९ रुपये | डिझेल ९९.५४ रुपये
कोल्हापूर : पेट्रोल ११२.५७ रुपये | डिझेल ९९.२३ रुपये (Crude Oil Prices)



कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक भू-राजकीय घडामोडी पाहता आगामी काळात इंधन दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील घडामोडींवर लागले आहे. (Crude Oil Prices)

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी