Nashik : वणी येथे मंडप काढताना विजेचा धक्का लागून मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

दिंडोरी : वणी येथे लग्नाचा मंडप काढण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मंडपाचा लोखंडी पाईप काढताना तो पाईप वरून गेलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने ही घटना घडली.



नेमकं काय घडलं ?


वणी येथील कृपा हॉस्पिटल परिसरात राहणारे नंदलाल गावित यांच्या मुलाच्या लग्नाचा कार्यक्रम दि. १८ रोजी पार पडला होता. यासाठी त्यांच्या घरासमोर मंडप उभारण्यात आला होता. हा मंडप काढण्यासाठी शिवरे येथील मंडप व्यावसायिक ऋषीकेश तुकाराम मत्सागर (वय २७, रा. शिवरे) हे दि. २० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गावित यांच्या घरासमोर गेले होते.



मंडप काढत असताना लोखंडी पाईप काढण्याच्या वेळी तो पाईप वरून गेलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात आला. त्यामुळे ऋषीकेश यांना जोरदार विजेचा धक्का बसून ते जमिनीवर कोसळले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.



ऋषीकेश मत्सागर हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून मंडप व्यवसाय करत होते. 'माऊली मंडप डेकोरेटर्स' या नावाने ते परिसरात परिचित होते. पाच वर्षांपूर्वी कोरोना काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात एक बहीण व लहान भाऊ असून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ऋषीकेश यांच्यावर होती. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अकाली निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत वणी पोलिस ठाण्यात सुरू होते.

Comments
Add Comment

Morning Health Tips : चहामुळे ॲसिडिटी होते? मग सकाळची सुरुवात करा 'या' हेल्दी पर्यायांनी

चहा पिल्यावर ॲसिडिटीचा त्रास होतो? मग पुढील पर्याय नक्की आहारात समावेश करा कोमट पाणी सकाळी रिकाम्या पोटी कोमट

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल बाळापूर : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक

Viral Video : 'आईने लग्न ठरवलं...', तरुणीने भलतंच कांड केला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये ती शांतपणे

Latur Viral Video : वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी

Nanded Crime : प्रेमाच्या नादात युवकाची चाकूने भोसकून हत्या

नांदेड : नांदेड शहरामध्ये शनिवारी (११जुलै) मध्यरात्री एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. सचिन यशवंत काळे (वय

Parth Pawar Engagement : पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली

२९ जुलै रोजी पुण्यात पार पडणार सोहळा; मैत्रीण कायनात धार हिच्यासोबत अडकणार विवाहबंधनात मुंबई : महाराष्ट्राचे