Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील


मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 22 जून 2026 होती. मात्र विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि विविध आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यास होत असलेला विलंब लक्षात घेऊन ही मुदत आता 2 जुलै 2026 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.



मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अंतिम मुदतीपर्यंत 1 लाख 45 हजार 708 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 1 लाख 15 हजार 53 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून मान्यतेसाठी अर्ज सादर केले आहेत.विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा, तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.




सुधारित अंतिम तारीख 02 जुलै 2026 करण्यात आली आहे तरीही इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत
प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, अर्ज सादरीकरणाची माहिती आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळ ला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून