साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६






















































अर्थमान उंचावेल


मेष : आपल्या कार्यक्षेत्रात खूप काम वाढणार आहे, त्यामुळे धावपळही वाढणार आहे. खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्यांचे काम वाढणार आहे, त्यामुळे परिवाराकडे लक्ष कमी दिले जाईल. यामुळे घरातील वातावरण आपणास चांगले ठेवावेच लागेल. घरातील व्यक्ती नाराज असतील. कुटुंबातील व्यक्तींना खूष करण्यासाठी छोट्या-मोठ्या सहलीचे आयोजन कराल. प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील. प्रेमी प्रेमिकांना मात्र हा कालावधी फारसा अनुकूल नाही. नात्यांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. कुठल्याही परिस्थितीत भावनांचा विचार करणे आवश्यक आहे. अर्थमान उंचावेल.


प्रवासाची शक्यता


वृषभ : या कालावधीमध्ये कुटुंबात तसेच भाऊ-बहीण यांच्या संबंधात काही गोष्टीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या जातकांना स्वतःच्या कार्यक्षेत्रात जास्तीचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी आपणावर सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये प्रवासाची शक्यता आहे. प्रवास शक्यतो शहराबाहेर होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घेणे. स्वतःचे वाहन स्वतः चालवल्यास चांगले. कोणाशी वाद होऊ देऊ नका.घरातील ज्येष्ठ व्यक्तींना प्रकृतीचा त्रास होण्याची शक्यता.

नवीन संधी प्राप्त होतील


मिथुन :घराच्या नूतनीकरणासाठी बराच खर्च होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आईच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वेळ प्रसंग पडल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या जातकांचा व्यवसाय कमिशन एजंट आहे त्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी, तरच त्यांना चांगले लाभ होऊ शकतात. शेअर मार्केटमधील व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात सकारात्मक विचार ठेवावेत. त्या दृष्टीने आपली वाटचाल सफलतेकडे होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्या कामाच्या शैलीत सकारात्मक बदल झाल्याने त्याचा त्यांना चांगला लाभ होईल


 

जीवनशैलीत मोठे चांगले बदल


कर्क :आपल्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, आपल्या जीवनशैलीतही मोठे चांगले बदल होण्याची शक्यता आहे. महिलांचे आपल्या जोडीदारावर बरोबर वाद विवाद होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद पेक्षा बसून चर्चा करून आपले प्रश्न सोडवा. सामंजस्याने प्रश्न सोडवा अन्यथा आपल्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळताना सावध असावे. छोट्या-मोठ्या जखमा होऊ शकतील. त्यामुळे सावध असावे. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील राजकारणात पडू नये. प्रेमिकांना हा कालावधी चांगला


 

 विशेष यश प्राप्त होणार आहे


सिंह : आपल्या जिद्दीने आपण सफलता मिळवणार आहात. व्यापार व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. जे जातक नोकरी करत आहे त्यांना सुद्धा नोकरीच्या कामांमध्ये अभूतपूर्व यश मिळणार आहे. शिक्षण वाढवण्याच्या दृष्टिकोनातुन आपली वाटचाल सुरू राहील. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, कॉमर्सचे विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त होणार आहे. आपल्या लोकप्रियतेमुळे आपला मित्रपरिवार वाढणार आहे. मित्रमंडळींबरोबर मनोरंजन आणि आनंद वाढवण्यासाठी सहलीचे आयोजन कराल. यातून आपणास भरपूर उत्साह व शक्ती प्राप्त होईल. यशाची वाटचाल सुरूच राहील. ज्या तरुण-तरुणींच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण होत होते त्यांचे विवाह ठरतील.


खर्चाचे प्रमाण वाढणार आहे


कन्या : व्यापार व्यवसायात आपले जे उत्पादन आहे त्या क्वालिटी पेक्षा चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्शन बाहेर लोकांना मिळाल्यामुळे, आपल्या व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. तसेच प्रेम प्रकरणापासून दूरच राहावे, अन्यथा लव पार्टनर बरोबर आपले वाद विवाद होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मनामध्ये संशयाचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण मानसिकरीत्या तणावात राहाल. गर्भवती स्त्रियांनी आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. महिला आपल्या आवडत्या गोष्टी मध्ये खर्च करण्यात मग्न असतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आपणास आतिशय काम असेल त्यामुळे विश्रांती घेणे विसरून जाल. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी जमा खार्चाकडे नीट लक्ष द्यावे.

कार्यमग्न राहाल


तूळ : आपल्या कुटुंबात आपल्या परिवारात मंगल कार्याचे आयोजन होणार आहे.व्यापार व्यवसायामध्ये एखाद्या मोठ्या कंपनीची आपल्याला ऑर्डर मिळणार आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मोठी मशिनरी खरी खरेदी करण्याची आवश्‍यकता पडू शकते. म्हणजेच गुंतवणूक वाढणार आहे. प्रेमी-प्रेमिकाना हा कालावधी चांगला आहे. आपला जोडीदार उच्च घराण्यातील आणि श्रीमंत असू शकततो. हे प्रेम प्रकरण पुढे विवाहात रुपांतर होऊ शकते. प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला थोडे थकल्यासारखे वाटेल. आपल्या स्वतःचा मूड ठीक करण्यासाठी मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्रोग्रॅम बनवाल. खेळाडू व्यक्तींचे खेळ चांगले होतील त्यामुळे ते चर्चेत रहातील. हा कालावधी आपल्या कार्यक्षेत्र साठी चांगला आहे. कार्यमग्न राहाल

आत्मविश्वास वाढवला पाहिजे


वृश्चिक : काही अशुभ ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वरिष्ठ व्यक्तींबरोबर वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये शेअर मार्केटपासून आपण लांबच राहावे. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आपण जर नोकरीमध्ये बदल करण्याची इच्छा असल्यास, हा विचार काही कालावधीसाठी स्थगित करणे लाभकारक आहे. व्यापार व्यवसायामध्ये दिलेल्या कालावधीमध्येच आपण आपले काम पूर्ण करावे. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे, नोकरी मिळविण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रयत्नांना यश येण्यासाठी आपल्यामध्ये सकारात्मक विचार व आत्मविश्वास वाढवला पाहिजे.


 

नवीन गुंतवणूका होतील


धनु :आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश येण्यासाठी आपणास जास्त कष्ट घेणे, जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेच ग्रहमान आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करताना खूप विचार करा अन्यथा करूच नये. त्यातल्या त्यात शेअर बाजारासाठी तर गुंतवणूक करूच नये. ज्यांना आपली प्रॉपर्टी भाडेतत्वावर द्यायची आहे घर किंवा दुकान त्यांनी लिखापढी नीट कराव्यात. कागदपत्रे नीट करावीत.नियम आणि अटी यांचे पालन काटेकोरपणाने करावे. पैतृक संपत्ती मध्ये काही वाद विवाद असतील कोर्टकचेरीची कामे असतील तर ते पुढे ढकलावी. या सप्ताहामध्ये आपण आपल्या सुविधांसाठी नवीन कपडे दागिने खरेदी करण्याकडे लक्ष असेल.आपण आपली गुंतवणूक सोन्यामध्ये कराल. नवीन गुंतवणूका होतील.

 

नवीन संधी मिळणार आहेत


मकर : आपण आपले रहाणी मान उंचवण्यासाठी आपण जास्त प्रमाणात खर्च कराल.या कालावधीमध्ये आपले घराचे स्वप्न किंवा दुकानाचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत. हे बजेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यापार व्यवसायामध्ये काही नवीन संधी आपणास उपलब्ध होतील. नोकरी व्यवसायातील टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करा.आपल्या कार्यक्षेत्रात आपणास पुर्ण लक्ष द्यावे लागणार आहे. सहकाऱ्यांसोबत छोटेसे वाद-विवाद मोठे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक लाभाच्या प्रमाणात मात्र वाढ होणार आहे. आर्थिक लाभ वाढवण्याच्या दृष्टिकोनात आपण प्रयत्नशील राहाल त्या प्रमाणात जास्त कष्टही कराल. आपण आपल्या जिद्दीने व चिकाटीने यश प्राप्त कराल.


मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते


कुंभ : आपण जर कुठल्या सामाजिक संस्थेमध्ये काम करत असाल तर ती संस्था नावारूपाला येईल प्रसिद्धी पावेल. नोकरी करणाऱ्यांसाठी जर विचार केला तर हा कालावधी आपणास बढती साठी चांगला आहे. किंवा पगार वाढ होऊ शकते.आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यापार व्यवसायिकांना आपले कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी चांगली संधी आहे. या कालावधीमध्ये आपण घर खरेदी किंवा वाहन खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील राजकारणामध्ये पडू नये. कौटुंबिक स्तरावर आपली द्विधा मनस्थिती राहील. कुटुंबात थोडेसे वातावरण तणावपूर्णक राहील. मन शांत ठेवून व आत्मविश्वास पूर्वक निर्णय घ्या.


 

सकारात्मक ऊर्जा चांगली असेल


मीन :आपण सोशल मीडियावर सारखा भाग घ्याल.आपले वैवाहिक जीवन चांगले असेल.वैवाहिक जीवनात सकारात्मक ऊर्जा चांगली असेल. आपण जर एकटे असाल तरआपल्याला विरुद्धलिंगी व्यक्तीबरोबर आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे.आपले आई-वडील किंवा घरातील जेष्ठ व्यक्तींचे आपल्याला सहकार्य लाभणार आहे.आपले प्रकृती स्वास्थ्य चांगले असले तरीही आपल्याला दक्षता घेणे आवश्यक आहे.नोकरी करणार्‍या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांना बरोबर लांबचे प्रवास करावे लागू शकतात.कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी