Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडून यंदा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय

- कोकणातील आंबा-काजूचे नुकसान आणि दुष्काळाच्या सावटामुळे पालकमंत्र्यांचे संवेदनशील पाऊल


- कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष न भेटता आपापल्या जिल्ह्यात 'गो-सेवा' व समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन


मुंबई : "कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेले नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली परवड, राज्यभर एल-निनोच्या सावटामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचे गडद संकट या पार्श्वभूमीवर, यंदा २३ जून रोजी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे," अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. आपल्या अधिकृत 'ट्विटर हँडल'वरून त्यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, सध्याच्या कठीण काळात कोणत्याही प्रकारच्या आनंदोत्सवापेक्षा उद्भवलेल्या परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.







वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतानाच मंत्री नितेश राणे यांनी आपल्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. "माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी मला प्रत्यक्ष भेटायला न येता आपापल्या जिल्ह्यात 'गो-सेवा' करावी व विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. हिंदुत्वाच्या संस्कारातून गोमातेची सेवा, गोसंवर्धनाच्या कार्यात सहभाग तसेच गरजूंना मदत आणि समाजहिताचे कार्य हेच खरे उत्सवाचे स्वरूप आहे," असे त्यांनी म्हटले आहे.



सध्याच्या या दुष्काळी आणि टंचाईच्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी दाखवलेला हाच सेवाभाव माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल, असे सांगत त्यांनी आपल्या संदेशाचा शेवट 'जय श्री राम !' या घोषणेने केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून स्वागत केले जात आहे.

Comments
Add Comment

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Samsung Galaxy : सॅमसंग गॅलेक्सी एस२६ एफई लीक; नवीन फीचर्स, एक्सिनोस २५०० प्रोसेसर आणि इतर तपशील उघड!

सॅमसंगचा आगामी फॅन एडिशन स्मार्टफोन 'गॅलेक्सी एस२६ एफई' (Galaxy S26 FE) लाँच होण्यापूर्वीच इंटरनेटवर त्याचे फीचर्स आणि

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

Prakash Abitkar : आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

Smriti Irani : दिखाऊपणा करणाऱ्या राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते म्हणून शिक्षण सुधारणांसाठी एक तरी सूचना केली आहे का ? स्मृती इराणींचा सवाल

नवी दिल्ली : दिखाऊपणा करणाऱ्या राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विरोधी पक्षनेते म्हणून शिक्षण सुधारणांसाठी एक तरी सूचना