Bollywood News : Google वर नोरा फतेहीची जादू,आलिया-प्रियंका-दीपिकालाही टाकले मागे, बनली सर्वाधिक सर्च होणारी बॉलिवूड स्टार

Bollywood News : बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे आलिया-प्रियंका-दीपिकालाही मागे टाकत सर्वाधिक सर्च होणारी बॉलिवूड स्टार ही नोरा फतेही ठरलीय.



फिफा वर्ल्ड कप सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स अन...


फिफा वर्ल्ड कप 2026 च्या उद्घाटन सोहळ्यातील दमदार परफॉर्मन्सनंतर Google वर सर्वाधिक सर्च होणारी बॉलिवूड स्टार म्हणून नोरा फतेही नाव समोर आले आहे. Google Trends मधील आकडेवारीनुसार, नोऱाने लोकप्रियतेच्या बाबतीत आलिया भट (Alia Bhatt), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.


12 जून रोजी FIFA World Cup 2026 च्या कॅनडा उद्घाटन सोहळ्यात नोऱाने ‘Siir Siir’ या गाण्यावर सादर केलेल्या परफॉर्मन्सने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या या सादरीकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यानंतर तिच्याबद्दलच्या Google सर्चमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली.



Google वर नोरा फतेहीची जादू


Google Trends च्या आकडेवारीनुसार, नोऱाच्या गाण्यांपासून ते तिच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत विविध गोष्टींबाबत इंटरनेट वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शोध घेतला. त्यामुळे ती सध्या जगभरात सर्वाधिक चर्चेत असलेल्या बॉलिवूड कलाकारांपैकी एक ठरली आहे. भारतासह मध्यपूर्व, युरोप आणि उत्तर अमेरिकेतही नोऱाचा मोठा चाहतावर्ग आहे. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधील तिचा सहभाग आणि वेगळी डान्सिंग स्टाइल यामुळे तिला जागतिक ओळख मिळाली आहे.



नोराची भावनिक पोस्ट


या यशानंतर नोऱाने सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानत भावनिक पोस्टही शेअर केली. इतक्या मोठ्या जागतिक मंचावर डान्स करण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि कुटुंबीय व जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा क्षण अनुभवता आल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. हा क्षण आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे तिने म्हटले आहे.


फिफा वर्ल्ड कपच्या भव्य मंचावर झळकल्यानंतर नोरा फतेहीची लोकप्रियता आणखी वाढली असून, आगामी काळात तिच्या वाट्याला आणखी मोठे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये

चित्रपट निर्मितीचा मोह या मराठी अभिनेत्याला महागात पडला; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते विजय निकम यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमा व मालिकांमध्ये