Parbhani : परभणीत मंदिराचे छत कोसळून दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू

परभणी : येथील यशवाडी येथील हनुमान मंदिराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर उभारण्यात येत असलेल्या सभामंडपाचे छत अचानक कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला असून ठिगाऱ्याखाली ३० ते ४० जण अडकले असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.



या दुर्घटनेत जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला आहे. ढिगारा हटवण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर केला जात असून जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. हनुमान मंदिरात झालेल्या या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात काही भाविक दर्शन घेताना दिसत आहेत. यावेळी अचानक मंडप कोसळतो आणि ढिगाऱ्याखाली अनेक भाविक गाडले जातात. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



या भीषण दुर्घटनेची पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गंभीर दखल घेतली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून आवश्यक मदतसाहित्य, क्रेन आणि बचाव यंत्रणा तातडीने घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख नेत्यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्य अधिक वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या प्रशासनाचे प्रमुख लक्ष्य ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

CM Devendra Fadnavis : ‘सीएसआर’ निधीच्या वापरासाठी राज्यात स्थापन होणार ‘महा सीएसआर प्राधिकरण’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणार मुंबई : महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी 'जेन-झी' इन्फ्लुएंसर्सना २५ हजारांची ऑफर?

- भाजपकडून व्हिडिओ पुरावा सादर; काँग्रेसचा 'फर्जीवाडा' उघड झाल्याचा दावा मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल

Jalgaon : भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लालमाती परिसरातील पहिलवान ढाब्याजवळ

Amit Satam : 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' काँग्रेसला कधीही स्वीकारणार नाही!

- अमित साटम; देशविरोधी शक्तींकडून पैसे घेऊन अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव मुंबई : देशातील तरुण वर्ग अर्थात