Rohit & Prasidh Krushna : रोहित शर्मा आणि प्रसिद्ध कृष्णाची ऐतिहासिक हॅटट्रिक; चेन्नई वन-डेत रचला नवा विक्रम !

चेन्नई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि रोहित शर्मा या जोडीने इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला,मात्र चेन्नईच्या कडक उन्हात प्रसिद्धच्या धारदार गोलंदाजीसमोर आणि रोहितच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणासमोर त्यांचा डाव कोसळला.





सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने (Prisdh Krushna) अफगाणिस्तानच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करत अनोखी 'हॅटट्रिक' (Hattrick) साजरी केली आहे. या हॅटट्रिकचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्धच्या गोलंदाजीवर हे तिन्ही सलग झेल स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने पकडले आहेत. यष्टीरक्षकाव्यतिरिक्त एकाच क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाच्या सलग तीन चेंडूंवर/विकेट्सवर झेल घेण्याचा हा क्रिकेटमधील अत्यंत वेगळा विक्रम आहे.डावाच्या दुसऱ्या षटकात प्रसिद्धने रहमानुल्ला गुरबाजला (५) रोहितकरवी झेलबाद केले.त्यानंतर सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रहमत शाहला आणि आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इब्राहिम झद्रानला (११)याच पद्धतीने बाद केले. या ऐतिहासिक कामगिरीसह रोहित आणि प्रसिद्धने एका वेगळ्या विक्रमाच्या यादीत आपले नाव कोरले आहे.



एकदिवसीय क्रिकेटच्या (One Day Cricket) इतिहासात एकाच गोलंदाजासाठी सलग तीन झेल घेणारा रोहित हा व्हीव्हीएस लक्ष्मण (२००२, २००४) आणि शिखर धवन (२०१८) यांच्यानंतर केवळ तिसरा भारतीय क्षेत्ररक्षक ठरला आहे. तसेच, डावातील पहिल्या तिन्ही फलंदाजांना अशा प्रकारे बाद करणारा सौरव गांगुली, मनोज तिवारी आणि सुरेश रैना यांच्यानंतर रोहित शर्मा हा चौथा क्षेत्ररक्षक ठरला.



वनडे सामन्यात एकाच गोलंदाजाच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षकाने घेतलेले तीन झेल (भारत)


१) व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गोलंदाज इरफान पठाण विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ 2004


२) शिखर धवन आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध बांगलादेश, दुबई 2018


३) रोहित शर्माने आणि गोलंदाज प्रसिध्द कृष्णा विरुद्ध अफगाणिस्तान, चेन्नई 2026





एका डावात पहिले तीन विकेट्स (बाद) मिळवण्यात सहभागी असलेला एकच क्षेत्ररक्षक (भारत)


सौरव गांगुली वि. वेस्ट इंडीज, बडोदा २००२


मनोज तिवारी वि. वेस्ट इंडीज, नॉर्थ साउंड २०११


सुरेश रैना वि. श्रीलंका, कार्डिफ २०१३


रोहित शर्मा वि. अफगाणिस्तान, चेन्नई २०२६ वनडे

Comments
Add Comment

Indian Hockey Team : हॉकी विश्वचषकापूर्वी भारतीय स्ट्रायकरांनी सांगितला यशाचा फॉर्म्युला

नवी दिल्ली : एफआयएच हॉकी विश्वचषक-2026 च्या सुरुवातीला आता दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह फिटनेस टेस्ट पास ; श्रीलंका मालिकेसाठी सज्ज

मुंबई : भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पास केली आहे. भारतीय संघ आणि

IND vs BRA : भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक क्षण! पाच वेळच्या विश्वविजेत्यांचा सामना भारतात होणार; भारतीय चाहत्यांसाठी आंनदाची बाब

मुंबई : भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये राऊंड ऑफ १६ खेळणारा फुटबॉल संघ

Cricketer Commits Suicide : नागपुरात १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या; संघात निवड न झाल्याची होती खंत

नागपूर: महाराष्ट्राच्या नागपूर शहरातून एक अतिशय मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये १७

CWG 2026 : ग्लासगोमध्ये भारताच्या लव्हप्रीत सिंगची ऐतिहासिक कामगिरी; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली शानदार लय

CWG 2026 : ग्लासगो येथे ऐतिहासिक कामगिरी; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सीमा कलिरामानाने पटकावले कांस्य पदक

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली चमकदार