नवी दिल्ली : देशभरात रविवारी, २१ जून रोजी १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ ची जय्यत तयारी सुरू असताना, आयुष मंत्रालयाने देशभरातील नागरिकांना या ऐतिहासिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य, सौहार्द आणि भारताच्या कालातीत योग परंपरेचा हा एक ऐतिहासिक सोहळा असणार आहे.
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी ...
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६चा मुख्य कार्यक्रम २१ जून रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक 'रेड रोड' येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देश एकत्र येऊन योगाभ्यास करेल आणि भारताचा योगाचा संदेश जगापर्यंत पोहोचवेल, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले. नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करताना जाधव यांनी, या वर्षी सांस्कृतिक मंत्रालय देशातील १०० ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी योग दिन २०२६ च्या कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याचे सांगितले. यामध्ये भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे आणि योगची प्राचीन परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल, असे ते पुढे म्हणाले. या ऐतिहासिक प्रसंगाचा भाग होण्याचे आणि आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ हा सोहळा संस्मरणीय व यशस्वी करण्यासाठी उत्साहाने योगदान देण्याचे आवाहन जाधव यांनी केले.
मुंबई : राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ...
या वर्षी, सांस्कृतिक मंत्रालय भारताच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आणि योग साधना यांमधील अनोखा संबंध अधोरेखित करण्यासाठी देशातील १०० महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी योग दिन २०२६चे आयोजन करत आहे. हे उत्सव देशातील २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केले असून यात महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, एलिफंटा (घारापुरी), मुंबई, पुणे, जुन्नर आणि नागपूर यांसह इतर शहरांचा समावेश आहे.






