Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना


मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ नेते प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्र एका मोठ्या संघर्षशील नेतृत्त्वाला मुकला आहे. माझ्या जीवनातील एक मार्गदर्शक मी गमावला आहे, अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.



आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ज्यासाठी संघर्ष केला, त्यासाठी जीवन समर्पित असेच आयुष्य ते जगले. मला तर त्यांच्याकडून व्यक्तिगतदृष्ट्या खूप काही शिकायला मिळाले. त्यांचे कायमच मोलाचे मार्गदर्शन मिळायचे. राजकारण आणि समाजकारण एकच आहे, असे मानणार्‍या पिढीचे ते नेतृत्त्व करीत होते. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेत त्यांनी पाचवेळा प्रतिनिधीत्त्व केले. प्राध्यापक, शिक्षकांच्या हक्कांसाठी तर ते लढलेच, पण अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी विशेषत्त्वाने वाचा फोडली.



एक अत्यंत अभ्यासू आणि प्रेरणादायी असे हे व्यक्तिमत्त्व होते. विधानपरिषदेतील त्यांची भाषणे ऐकत रहावी वाटायची. ती आजही नवीन सदस्यांसाठी प्रेरणादायी आहेत. विदर्भाच्या अनुशेषाविरोधात त्यांनी दिलेला लढा अत्यंत मोलाचा होता. मला आजही आठवते, सरकारी दरबारी भांडून न्याय मिळत नाही, म्हणून त्यांनी अनुशेष निर्मूलनासाठी थेट हायकोर्टात याचिका केली होती. सुनावणीच्यावेळी बी.टी. सरांसोबत मीही उपस्थित राहत होतो. सिंचन, पेयजल योजना यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. अमरावती विद्यापीठाच्या निर्मितीत सुद्धा त्यांचे योगदान होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि