Nashik : नाशिकमध्ये पुन्हा लाचखोरीचा पर्दाफाश! सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक एसीबीच्या जाळ्यात

Nashik : नाशिक जिल्ह्याला जणू लाचखोरीच्या ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. येवला येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला सावकारी परवान्याचे नूतनीकरण करायचे होते. हे काम करून देण्यासाठी मुख्य लिपिक सुधीर वाघ याने यापूर्वी तब्बल ६० हजार रुपये घेतले होते. मात्र त्यानंतरही त्याने आणखी ७ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. पुन्हा पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.


तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने येवला तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच सुधीर वाघ याला रंगेहात पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शरद हेंबाडे, युवराज खांडवी आणि चालक समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती, त्याच दिवशी तहसील कार्यालयाच्या आवारात ही धडक कारवाई करण्यात आली.



दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये स्वतःला एसीबी अधिकारी म्हणून सादर करणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्यालाही सातपूर पोलिसांनी अटक केली होती. उद्योग भवन परिसरात 'ॲंटी करप्शन'ची पाटी लावलेल्या मोटारीत फिरणाऱ्या सचिन ठोके याच्याकडे बनावट ओळखपत्र आढळून आले होते. त्याचा साथीदार रवींद्र द्विवेदी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.


एका बाजूला एसीबीचे नाव वापरून फसवणूक करणारे तोतये सक्रिय आहेत, तर दुसऱ्या बाजूला एसीबीचे अधिकारी लाचखोरांविरोधात कठोर कारवाई करत असल्याचे या घटनांमधून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान