फ्रान्स : फ्रान्समधील एव्हियान येथे पार पडलेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीने अनेक राजनैतिक घडामोडी घडल्या. मात्र, या सर्वांमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील खास केमिस्ट्री. भेटीदरम्यान मेलोनी यांनी मोदींना हसत-खेळत शुभेच्छा देताना, “पुन्हा भेटून आनंद झाला. आपण इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत,” असे म्हणत वातावरण हलकेफुलके केले. (PM Modi - PM Meloni)
भारत-अमेरिका व्यापार करार, शुल्क धोरण, गुंतवणूक आणि सामरिक भागीदारी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी मोदींचे स्वागत केले. परिषदेत सहभागी देशांच्या प्रमुखांचे सामूहिक छायाचित्रही काढण्यात आले. (PM Modi - PM Meloni)
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय (ISI) समर्थित ...
मोदींचा जागतिक विश्वासावर भर :
‘नवीन भागीदारी निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय एकतेचे नूतनीकरण करणे’ या विषयावरील उच्चस्तरीय सत्रात मोदींनी जागतिक विश्वास आणि सहकार्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, आजचे जग अधिक परस्परावलंबी झाले असले तरी कोणतीही भागीदारी विश्वासाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.
“आज जगात संसाधनांची नव्हे तर विश्वासाची कमतरता आहे. भविष्यातील भागीदारी ही विश्वास पुनर्स्थापित करण्यावर अवलंबून असेल,” असे मोदी म्हणाले. तसेच ग्लोबल साउथ देशांना केवळ मदतीची नव्हे तर समान भागीदारीची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. (PM Modi - PM Meloni)
मुंबई : उबाठा गटाचा सहावा खासदार राजी होत नसल्याने 'ऑपरेशन टायगर' रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...






