Thursday, June 18, 2026

Crude Oil Prices : अमेरिका-इराण शांतता कराराचा तेल बाजारावर परिणाम; क्रूड ऑईल घसरलं, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर काय?

Crude Oil Prices : अमेरिका-इराण शांतता कराराचा तेल बाजारावर परिणाम; क्रूड ऑईल घसरलं, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर काय?

अमेरिका आणि इराण यांच्यातील दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी १४ कलमी शांतता करारावर स्वाक्षरी केली असून, यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी हालचाल दिसून आली आहे. करारानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमती घसरल्या असून ब्रेंट क्रूडचा दर १.५३ टक्क्यांनी कमी होऊन ७८.३३ डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. (Crude Oil Prices)

'इस्लामाबाद मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग बिटवीन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड द इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या करारामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलपुरवठा सुरळीत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Crude Oil Prices)

शेजारील देशांत पेट्रोलचे दर घसरले :

जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम अनेक देशांमध्ये पेट्रोलच्या दरांवर दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची सरासरी किंमत १३०.८२ रुपयांवरून १२६.८४ रुपयांवर आली आहे. चीनमध्ये पेट्रोलचे दर १३२.८१ रुपयांवरून १५२५.३१ रुपये प्रति लिटरवर घसरले आहेत. नेपाळमध्ये पेट्रोलचा दर १३६.४१ रुपयांवरून १३५.४७ रुपये प्रति लिटर झाला आहे. बांगलादेशात पेट्रोलची किंमत ११२.६८ रुपयांवरून १११.५१ रुपयांपर्यंत खाली आली आहे. श्रीलंकेत पेट्रोल १४२ रुपयांवरून १३९.५८ रुपये प्रति लिटर झाले असून, म्यानमारमध्ये दर १४०.२० रुपयांवरून थेट ११८.३७ रुपयांपर्यंत घसरले आहेत. भूतानमध्ये पेट्रोलचा दर सध्या १०९.७३ रुपये प्रति लिटर आहे. (Crude Oil Prices)

भारतात दर कायम :

आंतरराष्ट्रीय बाजारात तेल स्वस्त झाले असले तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी सध्याचे दर कायम ठेवले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. (Crude Oil Prices)

जयपूरमध्ये पेट्रोलचा दर ११२.६६ रुपये आणि डिझेलचा दर ९७.७८ रुपये आहे. पाटण्यात पेट्रोल ११२.७० रुपये तर डिझेल ९९.८७ रुपये प्रति लिटर आहे. लखनौमध्ये पेट्रोल १०२.०५ रुपये आणि डिझेल ९९.२८ रुपये दराने उपलब्ध आहे. इंदूरमध्ये पेट्रोल ११४.६१ रुपये आणि डिझेल ९९.७० रुपये प्रति लिटर आहे, तर भोपाळमध्ये पेट्रोलचा दर ११४.६५ रुपये आणि डिझेलचा दर ९९.७४ रुपये प्रति लिटर आहे. (Crude Oil Prices)

करारामुळे इराणला मोठा दिलासा :

या शांतता करारानुसार इराणला आपला संवर्धित युरेनियम साठा कमी करावा लागणार आहे. त्याबदल्यात अमेरिकेकडून आर्थिक आणि व्यापारविषयक काही निर्बंध हटवले जाणार आहेत. यामुळे इराणला जागतिक बाजारात पुन्हा मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर इराणकडूनही मंजुरी मिळाल्यानंतर कराराच्या अंमलबजावणीची प्रक्रिया तातडीने सुरू झाली आहे. (Crude Oil Prices)

भारतात दर कमी होणार?

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी काही काळ कमी राहिल्यास त्याचा फायदा भारतीय ग्राहकांनाही मिळू शकतो. मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये तत्काळ कपात होईल का, याबाबत तेल कंपन्यांकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या सर्वांचे लक्ष क्रूड ऑईलच्या पुढील हालचालींकडे लागले आहे. (Crude Oil Prices)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >