Wednesday, June 17, 2026

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांकडे नवी जबाबदारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांकडे नवी जबाबदारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांच्यावर नव्या जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांची राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून ओ.पी. गुप्ता आणि सुवर्णा केवले यांचीही लोकायुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यातील सर्वोच्च घटनात्मक पदांवरील मान्यवरांच्या बैठकीत या तिन्ही नियुक्त्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली. (Rashmi Shukla)

राज्यातील लोकायुक्त संस्थेचे कामकाज अधिक प्रभावी आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष तसेच विरोधी पक्षाचे प्रतिनिधी अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Rashmi Shukla)

लोकायुक्त संस्थेतील सदस्य नियुक्त्या गेल्या काही काळापासून प्रलंबित होत्या. त्यामुळे संस्थेचे पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू होण्यास अडथळे येत होते. आता नव्या सदस्यांच्या नियुक्तीनंतर लोकायुक्त यंत्रणेला अधिक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. (Rashmi Shukla)

महाराष्ट्रात भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा मजबूत करण्यासाठी लोकायुक्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या विषयावर दीर्घकाळ जनआंदोलन उभारल्यानंतर राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. २०२४ मध्ये लोकायुक्त पदाची नियुक्ती झाली होती, मात्र सदस्यपदे रिक्त असल्याने संस्थेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. (Rashmi Shukla)

लोकायुक्त संस्था सार्वजनिक पदांवरील व्यक्तींविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करते आणि प्रशासनातील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विद्यमान कायद्यानुसार मुख्यमंत्रीदेखील लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार मुख्यमंत्र्यांविरोधातील तक्रारींची चौकशी करण्याचे अधिकार या संस्थेकडे आहेत. (Rashmi Shukla)

रश्मी शुक्ला, ओ.पी. गुप्ता आणि सुवर्णा केवले यांच्या नियुक्तीमुळे लोकायुक्त संस्थेच्या कामकाजाला नवी गती मिळेल, तसेच राज्यातील भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Rashmi Shukla)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा