PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च सन्मान; ३३ देशांकडून मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीत आणखी एका देशाची भर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)’ प्रदान करण्यात आला आहे. स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी सोमवारी (१५ जून २०२६) राजधानी ब्रातिस्लावा येथे हा सन्मान पंतप्रधान मोदींना प्रदान केला.


हा सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि तेथील जनतेचे आभार मानले. त्यांनी या गौरवाला भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील दृढ आणि दीर्घकालीन मैत्रीला समर्पित केल्याचे सांगितले. “हा सन्मान भारताच्या १.४ अब्ज नागरिकांचा आहे,” असेही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले.


या पुरस्कारासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जगातील ३३ देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याची नोंद झाली आहे. याआधी ३२ देशांनी त्यांना अशा प्रकारचे सन्मान प्रदान केले आहेत.



दरम्यान, स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनीही मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांनी भारतातील राजकीय स्थैर्य आणि सलग १२ वर्षे पंतप्रधानपद भूषवण्याच्या मोदींच्या कामगिरीला “राजकीय चमत्कार” असे संबोधले. ब्रातिस्लावामध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत फिको म्हणाले की, एवढ्या विविध आणि गुंतागुंतीच्या राजकीय वातावरणात दीर्घकाळ नेतृत्व टिकवणे ही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे. (PM Narendra Modi)



पंतप्रधान फिको यांनी पुढे सांगितले की, भारताची लोकशाही आणि नेतृत्व क्षमता जागतिक स्तरावर प्रेरणादायी आहे. मोदींचे दीर्घकालीन नेतृत्व हे भारताच्या स्थिर राजकीय व्यवस्थेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सन्मानामुळे भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (PM Narendra Modi)




Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून