Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी कोलकातातून जागतिक योग चळवळीचे करणार नेतृत्व

नवी दिल्ली : बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देणारा विशेष कार्यक्रम आज केंद्रीय आयुष मंत्रालयाने, नवी दिल्लीतील राष्‍ट्रीय माध्‍यम केंद्रामध्‍ये घेतला. या कार्यक्रमातून, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध समारंभांची घोषणा करण्यात आली. यंदाचा योगदिनाचा देशातील मुख्य कार्यक्रम, 21 जून रोजी पश्चिम बंगालच्या कोलकाता इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यानिमित्त, केंद्रीय आयुष तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मोनालिसा दाश, आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल आणि पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा उपस्थित होते.



यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिना ची संकल्पना " सुदृढ वृद्धत्वासाठी योग" अशी असून, हा विषय, ही या शतकातील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आणि संधींपैकी एका विषयाला स्पर्श करणारा आहे., असे जाधव यांनी यावेळी सांगितले. जगभरातील लोकांचे आयुर्मान पूर्वीपेक्षा अधिक वाढत आहे. मात्र, वार्धक्याकडे झुकल्यानंतरही, निरोगी, सक्रिय, स्वावलंबी आणि अर्थपूर्ण आयुष्य लाभणे, हेच खरे आव्हान आहे. योग हा निरोगी वृद्धत्वाचा काळाच्या कसोटीवर खरा ठरलेला आणि सर्वसमावेशक मार्ग आहे. तो शारीरिक आरोग्य सुदृढ करतो, मानसिक आरोग्याला चालना देतो आणि जीवनाची एकूण गुणवत्ता उंचावतो." असेही जाधव यांनी सांगितले.



आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आजवरच्या उल्लेखनीय वाटचालीचा आढावाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने भारताचा प्रस्ताव स्वीकारला. यामुळे योग साधनेचे रूपांतर एका भारतीय परंपरेतून आरोग्य आणि कल्याणासाठीच्या जागतिक चळवळीत झाले असल्याचे ते म्हणाले. आज योग साधना ही सीमा, संस्कृती आणि भाषांच्या पलीकडे गेली आहे, आणि आरोग्य, सौहार्द आणि कल्याणाच्या शोध घेत असलेल्या लोकांना एकत्र आणणारी एक परस्पर सामायिक जागतिक चळवळ म्हणून योग साधना उदयाला आली आहे, असे ते म्हणाले. या चळवळीच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय विस्तारावराबद्दलची माहितीही त्यांनी दिली. आयसीसीआर म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सहकार्याने परदेशातील 210 पेक्षा जास्त भारतीय दूतावास जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अभूतपूर्व सहभागातून योग साधनेबद्दलचे जागतिक आकर्षण तसेच विविध समाजांमधील सध्याच्या आरोग्य विषयक आव्हानांवर मात करण्यासाठी योग साधनेच्या उपयुक्ततेची प्रचिती येते असेही ते म्हणाले.



आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पूर्वतयारीच्या कालावधीदरम्यान साध्य केलेल्या एका मोठ्या यशाची घोषणाही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केली. 14 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष देशव्यापी योग सत्रात एकाच वेळी चार लाखांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. यामुळे एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. या यशातून लोकांमध्ये योग साधनेप्रती असलेला विलक्षण उत्साह दिसून येतो, तसेच या चळवळीतील लोकसहभाग दरवर्षी कशा रितीने यशाची नवी शिखरे गाठत आहे याचीही प्रचिती येते असे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने देशभरातील 100 महत्वाच्या ठिकाणी विशेष आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आयोजनांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि योग परंपरेचे एकात्मिकरण घडवून आणले जाईल असे ते म्हणाले. या उपक्रमातून आरोग्य, संस्कृती आणि राष्ट्रीय अभिमानाचा एक अनोखा संगम घडून येईल, तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे रूपांतर पिढ्यानपिढ्या आणि भौगोलिक सीमा ओलांडणाऱ्या एका उत्सवात होईल असे ते म्हणाले.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 चा मुख्य राष्ट्रीय सोहळा 21 जून रोजी कोलकाता इथल्या ऐतिहासिक रेड रोड इथे आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडेल अशी घोषणाही त्यांनी केली.यासोबतच गेल्या काही महिन्यांत आयोजित करण्यात आलेल्या काउंटडाउन कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेखही त्यांनी केला. याअंतर्गत नवी दिल्लीतील 100 दिवसांचा काउंटडाउन कार्यक्रम, महाराष्ट्रातील लोणार इथे 75 दिवसांचा कार्यक्रम, हैदराबादमधील कान्हा शांती वनम इथे 50 दिवसांचा कार्यक्रम आणि खजुराहो इथे 25 दिवसांच्या काउंटडाउन कार्यक्रमांचा समावेश होता.

13 ते 20 जून दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या "गंगोत्री ते गंगासागर: गंगा तट योग यात्रा" यावरही जाधव यांनी प्रकाश टाकला. गंगोत्री, हरिद्वार, वाराणसी, पटना, हुगळी आणि गंगासागर या ठिकाणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाचा उद्देश योगाला पर्यावरण संवर्धन, नदी संस्कृती आणि सामुदायिक सहभाग यांच्याशी जोडणे हा आहे. याशिवाय मुख्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोलकाता येथे काही विशेष कार्यक्रमांची मालिका देखील आयोजित केली जाणारे असल्याचे त्यांनी सांगितले. 19 जून रोजी शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करणारा "दौड से ध्यान" हा कार्यक्रम शहरातआयोजित केला जाईल, तर 20 जून रोजी "वंदे योगम्" तसेच पश्चिम बंगाल दिनाच्या सोहळ्यांसह इतर कार्यक्रमांमध्ये योग, देशभक्ती आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुसंवादी संगम दिसून येईल.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय