Iran - America War Peace Agreement : अखेर अमेरिका-इराण युद्धाचा शेवट! तब्बल १०७ दिवसांच्या संघर्षाला पूर्णविराम; होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार

पश्चिम आशियाला गेल्या १०७ दिवसांपासून हादरवून सोडणाऱ्या अमेरिका आणि इराणमधील युद्धाला अखेर पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने मोठी घडामोड झाली आहे. दोन्ही देशांनी ६० दिवसांच्या युद्धविरामाच्या फ्रेमवर्कवर सहमती दर्शवली असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास येत्या १९ जून म्हणजेच शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये ऐतिहासिक करारावर औपचारिक स्वाक्षरी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या महत्त्वपूर्ण कराराची घोषणा केली. (Iran - America War Peace Agreement)



जागतिक ऊर्जा बाजारावर सकारात्मक परिणाम :


या कराराचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर दिसून आला आहे. युद्धामुळे धोक्यात आलेली होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली असून, या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तब्बल ५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. जगातील सुमारे २० टक्के तेल आणि एलएनजीची वाहतूक या सामुद्रधुनीतून होत असल्याने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (Iran - America War Peace Agreement)


http://prahaar.in/2026/06/14/narendra-modi-innovation-is-in-indias-dna/

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सर्वप्रथम या युद्धविराम फ्रेमवर्कची माहिती दिली. दोन्ही देशांनी लष्करी कारवाया थांबवण्यास सहमती दर्शवली असून, आता आण्विक मुद्यांवरील चर्चेला गती दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Iran - America War Peace Agreement)


यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत, "इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. जगातील जहाजांनो, आपले इंजिन सुरू करा. होर्मुझ सामुद्रधुनी टोल-फ्री खुली करण्यास आणि अमेरिकन नौदलाची नाकेबंदी हटवण्यास मी मंजुरी देत आहे," असे म्हटले. (Iran - America War Peace Agreement)


मात्र, युद्धबंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी १९ जूननंतर होणार आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझ परिसरात लावलेली स्फोटके हटवली जातील आणि त्यानंतर हा मार्ग पूर्णपणे खुला केला जाईल. (Iran - America War Peace Agreement)



दरम्यान, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने (SNSC) देखील या कराराला मंजुरी दिली आहे. १४ जून रोजी इस्लामाबाद येथे चर्चेचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणचे मुख्य वार्ताकार मोहम्मद बाघेर कालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची जिनेव्हात पोहोचणार आहेत, तर अमेरिकेच्या वतीने उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स करारावर स्वाक्षरी करणार आहेत. इराणने दावा केला आहे की, लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्ध कारवाया तत्काळ थांबवल्या जाणार आहेत. (Iran - America War Peace Agreement)

Comments
Add Comment

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

Nepal Agniveer Recruitment Rally : ‘आम्हालाही भारतीय सैन्यात भरती करा!’ अग्निवीर योजनेसाठी नेपाळचे हजारो तरुण रस्त्यावर

काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी