Narendra Modi : नाविन्यता भारताच्या डीएनएमध्येच

फ्रान्समधील 'भारत इनोव्ह्हेट्स' सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन


नाईस (फ्रान्स) : भारताच्या तरुणांची मानसिकता नाविन्यपूर्ण असून, ती संपूर्ण मानवतेचा विचार करते. भारत आज केवळ संकुचित व्यावसायिक हितसंबंधांसाठी काम न करता मानवतेच्या कल्याणासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी जागतिक स्तरावर नवनवीन शोध लावत आहे. नाविन्यता (इनोव्हेशन) ही भारताच्या डीएनएमध्येच आहे," असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. फ्रान्समधील नीस येथे आयोजित 'भारत इनोव्ह्हेट्स' या भव्य व्यासपीठाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची विशेष उपस्थिती होती.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Mohan Bhagvat : आपण हिटलर नाही, संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत

दत्तात्रेय होसबळेंच्या विधानाला मोहन भागवत यांचे समर्थन तिरुवनंतपुरम : पाकिस्तानशी संवादाची दारे खुली ठेवली पाहिजेत," या राष्ट्रीय स्वयंसेवक ...



 

पंतप्रधान मोदींनी भारताच्या बदलत्या प्रतिमेवर प्रकाश टाकत सांगितले की, भारत हा जागतिक इनोव्हेशनमधील एक उगवती शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नसून, जगाला विविध क्षेत्रांत उपाय पुरवणारा देश बनत आहे. भारतात सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम कार्यरत आहे. या प्रदर्शनात जरी १००-१२५ स्टार्टअप्स दिसत असले, तरी भारताकडे आज २ लाखांहून अधिक स्टार्टअप्सचा अथांग पूल सज्ज आहे, जो जागतिक अर्थव्यवस्थेला गती देत आहे. हजारो वर्षांपूर्वी भारताने वैद्यकशास्त्र, योग, गणित आणि विज्ञान या क्षेत्रांतील आपल्या अद्वितीय योगदानातून मानवतेच्या प्रगतीला आकार दिला होता, त्याच वारशाचा विस्तार आजचा तरुण करत आहे.पंतप्रधानांनी जगभरातील गुंतवणूकदार, नामांकित विद्यापीठे, संशोधन संस्था आणि अग्रगण्य उद्योजकांना भारतासोबत भागीदारी करण्याचे थेट आवाहन केले. भारत इनोव्ह्हेट्स' हे जगासाठी भारतासोबत जागतिक नवसंशोधनाचा पुढील अध्याय लिहिण्याचे एक सशक्त माध्यम आहे. भारतात या, आमच्यासोबत काम करा. 'डिझाइन इन इंडिया' आणि 'डेव्हलप इन इंडिया' च्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी शाश्वत उपाय शोधा.




भारत-फ्रान्स संबंधांचे पंचसूत्र


दोन्ही देशांमधील मजबूत आणि धोरणात्मक संबंधांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्सचे नाते हे "कनेक्शन (संपर्क), कन्व्हिक्शन (विश्वास), इनोव्हेशन (नाविन्यता), इन्स्पिरेशन (प्रेरणा) आणि सामायिक दृष्टीकोन " या पंचसूत्रीवर आधारित आहे. जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी नेहमीच एकत्र पावले टाकली असून, हा नवा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. या प्रसंगी बोलताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचा "इनोव्हेशनचा देश" असा गौरव केला आणि भारताच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला फ्रान्सचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Mohan Bhagvat : आपण हिटलर नाही, संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत

दत्तात्रेय होसबळेंच्या विधानाला मोहन भागवत यांचे समर्थन तिरुवनंतपुरम : पाकिस्तानशी संवादाची दारे खुली ठेवली पाहिजेत," या राष्ट्रीय स्वयंसेवक ...



विविध क्षेत्रांत भागीदारी


'मेक इन इंडिया' अंतर्गत फ्रान्सने भारतासोबत अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाची धोरणात्मक भागीदारी केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लायमेट ॲक्शन (हवामान बदल) यांसारख्या गंभीर व जागतिक आव्हानांच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश अत्यंत मजबुतीने एकत्र काम करत आहेत. स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सच्या विकासासह नागरी अणुऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य आगामी काळात आणखी वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

Tags
Narendra Modi innovation statementInnovation is in Indias DNAPM Modi speech on technologyStartup India updates 2026PM Modi tech transformationIndian innovators global stageNational Innovation CouncilDigital India PM ModiIndian youth and technologyPM Modi quotes on innovation

Comments
Add Comment

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.