Devendra Fadnavis : गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते स्पष्ट संकेत


अन्न व औषध प्रशासन मार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल--मंत्री नरहरी झिरवाळ


मुंबई: "गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर मकोका लागू करता येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे हिवाळी अधिवेशनात विधानसभेत दिली होती. त्यानुसार गुटखा उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित साखळी कठोर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे,"असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क्सविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ म्हणजेच मकोका लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज १२ जून २०२६ रोजी स्पष्ट आदेश दिले.यानुसार अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या कारवायांमधून असे दिसून आले आहे की, काही प्रकरणांमध्ये केवळ किरकोळ विक्रेतेच नव्हे, तर उत्पादक, पुरवठादार, वित्तपुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते, उप-विक्रेते आणि इतर सहाय्यक घटक यांचा समन्वयित सहभाग असतो. अनेक वेळा बनावट कागदपत्रे, बनावट चलने, डमी कंपन्या, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे, आंतरराज्य पुरवठा साखळी, तसेच वाहतूक व वितरणासाठी विविध मार्गांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा कारवाया केवळ अन्नसुरक्षा उल्लंघनापुरत्या मर्यादित न ठेवता, पात्र प्रकरणांत संघटित गुन्हेगारीच्या कारवाई केली जाणार आहे.


अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत असुरक्षित अन्नाचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. सदर अधिनियमाच्या कलम ५९ अंतर्गत अशा गुन्ह्यांसाठी कारावासाची तरतूद आहे. कलम ६४ अंतर्गत पुनरावृत्ती झाल्यास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. तसेच कलमे ३८ व ४१ नुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणी, शोध व जप्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. कलम ४२ अंतर्गत अभियोजन सुरू करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा यापूर्वी निर्णय शासनाने घेतला होता."महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी कायदयाची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल" असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सूचित केले आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक