Retail inflation rate : मे महिन्यात किरकोळ महागाई दर ३.९३ टक्क्यांवर

नवी दिल्ली : देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. मे महिन्यात अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई दर ३.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हा दर ३.४८ टक्के होता.सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, सीपीआयवर आधारित किरकोळ महागाई दरात झालेली ही वाढ प्रामुख्याने अन्नधान्यांच्या किमती आणि भाज्या, विशेषतः टोमॅटो यांच्या वाढत्या किमतींमुळे झाली आहे. मागील पाच महिन्यांत पहिल्यांदाच खुदरा महागाई भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यमकालीन चार टक्के उद्दिष्टाच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे.


राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे मे महिन्यात सीपीआय आधारित किरकोळ महागाई दर ३.९३ टक्क्यांवर गेली. यापूर्वी एप्रिलमध्ये हा दर ३.४८ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात अन्नपदार्थांची महागाई ४.७८ टक्क्यांवर गेली, जी एप्रिलमध्ये ४.२० टक्के होती. विशेष म्हणजे, शहरांच्या तुलनेत ग्रामीण भारतात अन्नमहागाई जास्त राहिली. मे महिन्यात ग्रामीण भागात अन्नपदार्थांची महागाई ४.८५ टक्के नोंदवली गेली, तर शहरी केंद्रांमध्ये ती ४.६६ टक्के होती.राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, मे महिन्यात ज्या वस्तूंच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली, त्यामध्ये मौल्यवान धातूंनी बनवलेले दागिने, टोमॅटो, आले, किशमिश आणि मुनक्का यांचा प्रामुख्याने समावेश आहे. दुसरीकडे, बटाटे, मटार, मोटार कार आणि जीप, जिरे तसेच मोटरसायकल आणि स्कूटर यांसह इतर वस्तूंचा महागाई दर सर्वात कमी राहिला.सरकारने आरबीआयला किरकोळ महागाईचा दर २ टक्क्यांच्या फरकाने ४ टक्क्यांवर राखण्याचे काम सोपवले आहे. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात चालू वित्तीय वर्ष २०२६-२७ साठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ४.६ टक्क्यांवरून वाढवून ५.१ टक्के केला होता. चलनविषयक धोरण ठरवताना भारतीय रिझर्व्ह बँक मुख्यतः सीपीआय आधारित महागाईचा विचार करते.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक