Municipal Commissioner's administration : महानगरपालिकेच्‍या अधिकारी - कर्मचा-यांना 'ए.आय.' बाबत प्रशिक्षण



महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश



मुंबई : 'उपयोग ' हा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी डिजिटल अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेला एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून, त्याद्वारे नागरिकांना विविध महानगरपालिका सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातात. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व सेवा-सुविधा टप्प्याटप्प्याने उपयोग प्लॅटफॉर्मशी एकात्मिक करून नागरिकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून द्याव्यात. . कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्‍या अधिकारी - कर्मचारी यांच्‍याबरोबरच अभियंते, डॉक्‍टर यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्‍यासाठी कोर्सेस तयार करावेत. तज्‍ज्ञांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत. कामाच्‍या स्‍वरूपानुसार संगणकीय मूलभूत प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून अधिक कार्यक्षमतेने कामकाज केले जाईल. या ए.आय.बाबतही वेळोवेळी प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.




मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक गुरुवारी ११ जून २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, सह पोलिस आयुक्‍त (वाहतूक) सत्‍य नारायण चौधरी यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीदेखील या बैठकीस उपस्थिती होती.




भविष्यात कोणत्याही विभागामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या नवीन ऑनलाइन सेवा व सुविधाही उपयोग प्लॅटफॉर्मशी अनिवार्यपणे संलग्न करण्यात याव्यातत. जेणेकरून नागरिकांना सर्व सेवा सुलभ, पारदर्शक आणि अखंडित पद्धतीने उपलब्ध होतील, असे निर्देश भिडे यांनी दिले. याशिवाय, महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी 'थ्री-डी (थ्रीडी) डेटा'चा प्रभावी वापर करावा तसेच थ्री-डी मॅपिंगचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. विविध विभागांकडील डेटा आणि जीआयएस (जीआयएस) माहितीचे एकत्रीकरण करून एकात्मिक डिजिटल माहिती प्रणाली विकसित करावी, जेणेकरून सर्व आवश्यक माहिती एका ठिकाणी उपलब्ध होऊन नियोजन, निर्णयप्रक्रिया आणि सेवा वितरण अधिक परिणामकारकपणे करता येईल,असेही त्यांनी नमूद केले.


कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. महानगरपालिका सेवांमध्येही ए.आय.चा वापर करून नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून द्याव्‍यात. कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, पाणीपुरवठा, तक्रार निवारण आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये ए.आय. आधारित प्रणालीचा उपयोग करावा. यामुळे सेवांची गुणवत्ता सुधारते तसेच वेळ आणि संसाधनांची बचत होते. मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका सेवा-सुविधांचा अधिक प्रभावीपणे लाभ घेता येईल, यासाठी प्रयत्‍न करावेत. महानगरपालिकेच्‍या अधिकारी - कर्मचारी यांच्‍याबरोबरच अभियंते, डॉक्‍टर यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्‍यासाठी कोर्सेस तयार करावेत. तज्‍ज्ञांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत. कामाच्‍या स्‍वरूपानुसार संगणकीय मूलभूत प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून अधिक कार्यक्षमतेने कामकाज केले जाईल. ए.आय.बाबतही वेळोवेळी प्रशिक्षण द्यावे, असेही निर्देश भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.