हिंदू संस्कृतीत तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात (धोंड मास) जावयाला घरी बोलावून त्याचा शाही पाहुणचार करण्याची आणि त्याला गोडधोड खाऊ घालण्याची एक सुंदर प्रथा म्हणजे 'धोंडे जेवण'. मात्र अधिक मासनिमित्त केला जाणारा धोंडे जेवणाचा कार्यक्रम वेगळ्याच वळणावर येऊन थांबलेला आहे.
अधिक मासानिमित्त सासुरवाडीत सध्या जावयांसाठी पुरणपोळी, आमरसासोबत धोंडे जेवण देऊन सोन्याच्या अंगठीसह आहेर केला जात आहे. मराठवाड्यात धोंडे जेवणाबाबत अनेक रंजक घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी तर चक्क राजकीय मंडळींकडून धोंडे जेवणाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यामध्ये नर्तकींचे सादरीकरण, ऑर्केस्ट्रा आणि गावजेवण अशा माध्यमातून विविध प्रयोगही पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यात एका मांजरीने सोन्याची अंगठी ठेवलेला धोंडा खाल्ल्याची घटना घडली. त्यानंतर त्या मांजरीला चार दिवस कैदेत ठेवण्यात आले. तरीही अंगठी सापडत नसल्याने शेवटी शस्त्रक्रिया करून मांजरीच्या पोटातून ती अंगठी काढण्यात आली.
नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) तुघलकाबाद परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका पाच मजली निवासी इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला, ...
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक असलेल्या एका पदाधिकाऱ्याने धोंडे जेवणाचा कार्यक्रम नर्तक-नर्तकींच्या सादरीकरणासह पार पाडला. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात धोंडे जेवणासाठी सासुरवाडीला आलेल्या एका जावयाला जुन्या वादातून चुलत मेहुण्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. औंढा नागनाथ तालुक्यातील येडू येथे ही घटना घडली. लाकडी काठीने झालेल्या मारहाणीत जावई जखमी झाला असून, हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे. त्यानंतर औंढा नागनाथ पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अधिक मासनिमित्त केला जाणारा धोंडे जेवणाचा कार्यक्रम वेगळ्याच वळणावर येऊन थांबलेला आहे.
आणखी एक हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यात काल घडली. अधिक मासाच्या निमित्ताने माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. याच गर्दीदरम्यान, काही भाविकांची बोट अचानक उलटल्याची दुर्घटना घडली. या अपघातात दोन महिलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, बारा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मृत झालेल्या दोन्ही महिला विदर्भातील असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींपैकी एका महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचवण्यात यश आले. प्राथमिक तपासात बोटीत क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे तहसीलदार दामोदर जाधव यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचाही आढावा घेतला जात आहे. दरम्यान, अधिक मासानिमित्त मराठवाड्यातील सर्वच बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. जावयांचा मानसन्मान, तसेच त्यांना दिले जाणारे स्नेहभोजन यामुळे ग्रामीण भागात सध्या उत्साहाचे आणि सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक स्थळांवरही मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ पाहायला मिळत असून, सर्वत्र श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण आहे.
अमेरिका : अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे (Conflict) जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या ...
माहूर येथील रेणुका देवी, औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिर तसेच परळी येथील मंदिर परिसरात सध्या अधिक मास आणि धोंडे जेवणानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः जावई व लेकींना धोंडे जेवणासाठी निमंत्रित करण्याची परंपरा ग्रामीण भागात आजही मोठ्या उत्साहात पाळली जात असून, कुटुंबातील आपुलकी, स्नेह आणि सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा एक भाग म्हणून या प्रथेकडे पाहिले जाते. या निमित्ताने धार्मिक स्थळांवर केवळ धार्मिक विधीच नव्हे तर सामाजिक भेटीगाठी, कौटुंबिक एकत्रीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे. दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या परंपरेला राजकीय रंगही चढताना दिसत आहे, असे काही ठिकाणी बोलले जात आहे.
विधान परिषदेच्या राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकण्यासाठी काही उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क वाढवण्याचे प्रयत्न विविध माध्यमांतून सुरू असल्याचे चित्र दिसते. त्यातच धोंडे जेवणाच्या निमित्ताने मतदारांना सहलीचे निमंत्रण देणे, लहान-मोठ्या भेटवस्तू देणे किंवा पॅकेज टूर्सचे आयोजन करणे अशा गोष्टी घडत असल्याच्या चर्चा ग्रामीण भागात रंगत आहेत. काही ठिकाणी निवडक मतदारांसाठी विशेष सहलींची व्यवस्था, तर काही ठिकाणी गटागटाने प्रवासाची सोय केली जात असल्याचेही सांगितले जाते.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत या धोंडे जेवणाच्या सरसकथा ऐकावयास मिळत आहेत. यंदाचा अधिक मास हा राजकारणी लोकांना पावणारा ठरत आहे. सत्ताधारी मतदारच नव्हे, तर विरोधी पक्षांतील मतदारही धोंडे जेवणाच्या निमित्ताने मिळणाऱ्या पॅकेज टूर्सचा फायदा घेत आहेत. अधिक मासाच्या या काळात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धोंडे जेवणाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, अनेक राजकीय घटक या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
काही ठिकाणी हे कार्यक्रम सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम म्हणून साजरे होत असले तरी, त्यातून राजकीय उपस्थिती आणि प्रभाव दाखविण्याची संधीही घेतली जात असल्याची चर्चा आहे. परिणामी, ग्रामीण भागात या कार्यक्रमांना उत्सवी स्वरूप प्राप्त झाले असून, लोकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता आणि चर्चा दोन्ही वाढल्या आहेत. दरम्यान, काही भागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीबाबत केलेल्या आवाहनाचा संदर्भ देत असले तरी, ग्रामीण भागात धोंडे जेवणाच्या वेळी जावयाला सोन्याची अंगठी देण्याची परंपरा आजही काही कुटुंबांमध्ये पाळली जात असल्याचे दिसते. सोन्याला मान देण्याची ही जुनी प्रथा सामाजिक प्रतिष्ठा आणि आपुलकीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे आधुनिक आर्थिक आवाहनांनंतरही काही रूढी-परंपरा ग्रामीण संस्कृतीत टिकून राहिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. एकूणच, अधिक मासातील धोंडे जेवणाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक स्नेह, सामाजिक परंपरा आणि राजकीय हालचाली यांचा एकत्रित संगम मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींमुळे या काळाला एक वेगळे सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, स्थानिक पातळीवर त्यावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
___डॉ. अभयकुमार दांडगे