Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जिमच्या दिशेने अंदाजे सात राऊंड गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Guru Randhawa)


मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जिमजवळ पोहोचताच अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात जिमच्या काचा फुटल्या असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.



दरम्यान, घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्यामध्ये लोरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi Gang) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय एक ऑडिओ क्लिपही समोर आली असून त्यात स्वतःला टोळीचा सदस्य सांगणारी व्यक्ती हा हल्ला जाणीवपूर्वक केल्याचा दावा करताना ऐकू येत आहे.


व्हायरल ऑडिओमध्ये गायक गुरू रंधावाचे सलमान खान (Salman Khan) यांच्याशी असलेले कथित संबंध हे हल्ल्याचे कारण असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची किंवा सोशल मीडिया पोस्टची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही.


घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली जात आहे. तसेच व्हायरल पोस्ट आणि ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याचे कामही सुरू आहे.



पोलिसांच्या मते, तपासाच्या सर्व बाजूंची सखोल चौकशी केली जात असून गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

Chamoli tunnel tragedy : ७ कामगारांचा मृत्यू; ३ अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा