Mobile Network in Metro 3 Aqua Line : अखेर तीन महिन्यांनी झाला ‘नो नेटवर्क’चा अंत! मेट्रो-3च्या ॲक्वा लाईनमध्ये मोबाईल सेवा सुरळीत सुरु

- दररोज होणार दीड लाख प्रवाशांना फायदा


मुंबई : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ भूमिगत प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्कपासून वंचित राहिलेल्या मेट्रो-३ ॲक्वा लाईनच्या (Mobile Network in Metro 3 Aqua Line) प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी सामोर आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने ॲक्वा लाईनवर मोबाईल कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रवासादरम्यान कॉल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल पेमेंटसारख्या सुविधा वापरणे शक्य होणार आहे. (Mobile Network in Metro 3 Aqua Line)


एमएमआरसीएलचे संचालक आर. रमणा यांनी सांगितले की, बुधवारपासून (१० जून) मुंबई मेट्रो-३ मध्ये मोबाईल सेवा सुरू करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. सध्या भारती एअरटेलची सेवा आरे-जेव्हीएलआर ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या मार्गावरील स्थानके आणि बोगद्यांमध्ये उपलब्ध झाली आहे. (Mobile Network in Metro 3 Aqua Line)


तर व्होडाफोन आयडिया (Vi) ने आरे-जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक या मार्गावरील १६ स्थानकांमध्ये सेवा सुरू केली आहे. यात सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, सीएसएमआय विमानतळ टी-२, सांताक्रूझ, बांद्रा कॉलनी, बीकेसी, धारावी, दादर, सिद्धिविनायक आणि वरळी यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. काही ठिकाणी उपकरणांच्या पुनर्स्थापनेचे काम सुरू असल्याने नेटवर्कमध्ये किरकोळ अडथळे येत आहेत, मात्र ते लवकरच दूर होतील. (Mobile Network in Metro 3 Aqua Line)



दररोज दीड लाख प्रवाशांना फायदा :


मेट्रो-३ ॲक्वा लाईन (Mobile Network in Metro 3 Aqua Line) ही मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाची जीवनवाहिनी बनत असून दररोज सुमारे १.५ लाख प्रवासी या मार्गाचा वापर करतात. या मार्गावर दररोज २९० हून अधिक फेऱ्या चालवल्या जातात. मोबाईल सेवा बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना संपर्क तुटणे, ऑनलाईन व्यवहार न होणे आणि कामाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ऑफिस टाईममध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांनी नेटवर्क नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती. आता मोबाईल सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.



जिओ, एअरटेल आणि Vi एकत्र :


मार्च महिन्यात एमएमआरसीएलने ॲक्वा लाईनसाठी (Mobile Network in Metro 3 Aqua Line) नवीन इन-बिल्डिंग सोल्यूशन (IBS) सेवा पुरवठादार शोधण्यासाठी निविदा काढली होती. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने एमएमआरसीएलने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या प्रमुख दूरसंचार कंपन्यांना एकत्र आणून कनेक्टिव्हिटी सुरू करण्याचा निर्णय घेतला.



सध्या एअरटेल आणि Vi च्या सेवा उपलब्ध झाल्या असून आगामी काही दिवसांत रिलायन्स जिओची सेवाही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण ३३.५ किलोमीटर लांबीच्या ॲक्वा लाईनवर अखंड मोबाईल नेटवर्क उपलब्ध होणार आहे. (Mobile Network in Metro 3 Aqua Line)


Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे