Jaigad Port : रत्नागिरीतील जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

 कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणी; स्वतंत्र द्रुतगती महामार्ग बांधणार


मुंबई : कोकण किनारपट्टीवरील मालवाहतूक आणि दळणवळणाला गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि 'ऑल वेदर' बंदर म्हणून ओळखले जाणारे जयगड बंदर आता थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याशी जोडले जाणार आहे. यासाठी 'जयगड बंदर-चिपळूण-सातारा' असा स्वतंत्र द्रुतगती महामार्ग (एक्सप्रेस-वे) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे साडेपाच तासांचे हे अंतर अवघ्या एका तासात कापता येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास राज्यातील कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना किनारपट्टीशी जोडणी मिळणार आहे.



जवळपास ९ हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा ९८ किलोमीटर लांबीचा महामार्ग रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या चार महत्त्वाच्या जिल्ह्यांतून जाणार आहे. जयगड हे खोल पाण्याचे बंदर म्हणून ओळखले जाते. त्याची १७.५ मीटर इतकी आहे. या बंदराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे बंदर वर्षभर, ३६५ दिवस मालवाहतुकीची हाताळणी करते. कोणत्याही हवामानात हे बंदर कार्यान्वित असते. सध्या आंबा, काजू आणि मासे निर्यातीचे 'हब' म्हणून या बंदराचा विकास केला जात आहे. त्यामुळे येथील मालाची देशांतर्गत बाजारपेठेत जलद वाहतूक व्हावी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढावी, या उद्देशाने या एक्सप्रेस-वेची आखणी करण्यात आली आहे.

कधीपर्यंत पूर्ण होणार?


- हा प्रकल्प सध्या प्राथमिक स्तरावर असून त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रकल्पाचा सविस्तर बृहत आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी 'एनएचएआय'कडून लवकरच एका सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे.
- सल्लागाराच्या अहवालानंतर महामार्गाची अंतिम लांबी, तो नेमका किती मार्गिकेचा (लेन) असेल, त्यात किती पूल किंवा बोगदे असतील, तसेच तो कोणकोणत्या गावांमधून जाईल हे निश्चित होईल.
- या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया राबवली जाईल. हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमाल आणि औद्योगिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेशी जोडणारा मुख्य मार्ग ठरणार असला, तरी प्रवाशांना या तासाभराच्या प्रवासासाठी पुढील काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून